'एसईबीसी' वगळून तीन विभागांची पदभरती ! 50 टक्‍के पदभरतीस मान्यता

0Mantralaya_Mumbai_20_281_29_20_20Copy_2 - Copy.jpg
0Mantralaya_Mumbai_20_281_29_20_20Copy_2 - Copy.jpg
Updated on

सोलापूर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्यानंतर मेगाभरती, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यानंतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात एसईबीसी'चा प्रवर्ग वगळून संबंधितांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय झाला. आता मेडिकल, पोलिस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्‍त पदांपैकी 50 टक्‍के पदांची भरती करतानाही हा फॉर्म्यूला वापरला जाणार आहे. तिन्ही विभागात एकूण दहा हजारांपर्यंत पदांची भरती केली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली.


मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार तिन्ही विभागांना पाठविले पत्र
वित्त विभागाच्या परवानगीनंतर मेडिकल, पोलिस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्‍त पदांपैकी 50 टक्‍के जागा (एसईबीसी वगळून) भरतीस मान्यता मिळाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार संबंधित विभागांनी पदभरतीची कार्यवाही करावी, असे पत्र सामान्य प्रशासन विभागाने पाठविले आहे.
- डी. एस. करपते, उपसचिव, सामान्य प्रशासन

मेगाभरतीच्या अनुषंगाने राज्य सरकारने यापूर्वी काढलेल्या आदेशात आता सुधारणा केली जाणार आहे. एसईबीसी' प्रवर्ग वगळून खुल्या प्रवर्गासह अन्य संवर्गातून पदांची भरती केली जाणार आहे. दुसरीकडे या विभागातील रिक्‍त पदांसाठी ज्या उमेदवारांनी 'एसईबीसी' या प्रवर्गातून अर्ज केले आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातून परीक्षा देण्याचा पर्याय खुला करुन दिला जाणार असल्याचेही सामान्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने मेडिकल, पोलिस व सार्वजनिक आरोग्य विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागांमधील नव्या पदभरतीला वित्त विभागाने मान्यता दिलेली नाही. राज्यातील सर्वच शासकीय विभागांमधील रिक्‍त पदांची संख्या आता सव्वादोन लाखांवर पोहचली आहे. त्यापैकी अत्यावश्‍यक असलेल्या तीन विभागांमधील 50 टक्‍के पदांची भरती प्रक्रिया आता 15 दिवसांत सुरु केली जाणार आहे.

ठळक बाबी...

  • राज्यातील 29 सरकारी विभाग व जिल्हा परिषदांमध्ये तब्बल सव्वादोन लाख रिक्‍त पदे
  • गृह, सार्वजनिक आरोग्य विभागांमधील रिक्‍त पदांची संख्या 46 हजारांवर
  • वित्त विभागाच्या मान्यतेनंतर पहिल्या टप्प्यात 10 ते 12 हजार पदांची होईल भरती
  • 'एसईबीसी' प्रवर्ग वगळून अन्य संवर्गातील पदांची होणार पदभरती; आरक्षणाच्या अंतरिम निर्णयानंतर होईल बदल
  • सामान्य विभागाच्या पत्रानंतर मेडिकल, सार्वजनिक आरोग्य व पोलिस विभागांची पदभरतीच्या दृष्टीने सुरु केली तयारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com