esakal | देशात यंदा साखरेच्या उत्पादनात 50 लाख टनांची घट 
sakal

बोलून बातमी शोधा

sugar

देशात 2019-20 च्या गाळप हंगामात 15 फेब्रुवारीअखेर साखरेचे उत्पादन 169.85 लाख टन इतके झाले आहे. गतवर्षी याच तारखेला 219.66 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.

देशात यंदा साखरेच्या उत्पादनात 50 लाख टनांची घट 

sakal_logo
By
अनिल सावळे

पुणे - देशात 2019-20 च्या गाळप हंगामात 15 फेब्रुवारीअखेर साखरेचे उत्पादन 169.85 लाख टन इतके झाले आहे. गतवर्षी याच तारखेला 219.66 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. या हंगामात 449 साखर कारखान्यांपैकी 23 साखर कारखान्यांनी उसाच्या उपलब्धतेअभावी गाळप थांबविले आहे. गतवर्षी 521 साखर कारखान्यांनी गाळप घेतले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात यंदा 15 फेब्रुवारीअखेर साखरेचे उत्पादन 43.38 लाख टन झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत उत्पादन 82.98 लाख टन होते. या हंगामात 143 कारखान्यांपैकी आठ कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. गतवर्षी 193 साखर कारखाने सुरू होते. म्हणजेच महाराष्ट्रात यंदा उसाचे प्रमाण कमी असल्यामुळे 50 कारखाने बंद आहेत. दुष्काळ आणि अतिवृष्टीचा मोठा फटका राज्यातील साखर उद्योगाला बसला आहे. 

उत्तर प्रदेशात 119 कारखान्यांनी 66.34 लाख टन साखर उत्पादन केले आहे. गतवर्षी 117 कारखान्यांनी 63.93 लाख टन उत्पादन केले होते. कर्नाटकात 63 साखर कारखान्यांनी 63.80 लाख टन उत्पादन घेतले; तर गतवर्षी 66 कारखान्यांनी 38.74 लाख टन उत्पादन घेतले होते. 

तामिळनाडूमध्ये 21 कारखान्यांनी 2.60 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले. गेल्या हंगामात 32 कारखान्यांनी 3.85 लाख टन उत्पादन घेतले होते. गुजरातमध्ये 15 साखर कारखाने सुरू असून, त्यांनी 5.95 लाख टन उत्पादन घेतले आहे. गतवर्षी 16 कारखान्यांनी 7.78 लाख टन साखर उत्पादित केली होती. 

आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये 18 कारखानदारांनी तीन लाख टन साखर उत्पादन केली आहे. मागील हंगामात 25 कारखान्यांनी साडेचार लाख टन उत्पादन केली होती. बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये साखरेचे उत्पादन अनुक्रमे 5.08 लाख टन, 2.41 लाख टन, 3.72 लाख टन, 3.51 लाख टन आणि 2.76 लाख टन इतके आहे. देशात सध्या साखर कारखान्यांमधील दर प्रतिक्‍विंटल 3100 ते 3300 रुपये असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) वतीने देण्यात आली. 

केंद्र सरकारने गतवर्षी 50 लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतला होता. त्यापैकी 38 लाख टन साखरेची निर्यात झाली होती. यंदा देशात 60 लाख टन साखरेची निर्यात करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी 16 लाख टन साखर निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर पाहता 50 लाख टनांपर्यंत निर्यात होणे अपेक्षित आहे. 
- संजय बॅनर्जी, प्रवक्‍ता, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, दिल्ली. 

loading image