Maharashtra Politics: कोठेंनी नाकारले, भालकेंनी स्वीकारले, बीआरएसला सोलापूरात जनशक्ती साथ देईल ?

कोठेंनी नाकारले, भालकेंनी स्वीकारले
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal

तेलगंणाशी असलेली नाळ, तेलुगू भाषिक यामुळे बीआरएसच्या गळाला महेश कोठे सर्वप्रथम लागतील, असाच अनेकांचा अंदाज होता. बीआरएसकडून कोठेंकडे विचारणाही झाल्याचे समजते. कोठेंनी भविष्याचा विचार करून तूर्तास घड्याळच बरे असल्याचा सांगावा धाडल्याचे दिसते. राष्ट्रवादीलाही सोलापुरात विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सध्या तरी कोठेंशिवाय अन्य ठोस पर्याय दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरच्या दौऱ्यात कोठे यांच्यासाठी राजकीय जुळवाजुळव केल्याचे दिसले. (Latest Marathi News)

भाषेच्या आणि जातीच्या मुद्यांवर बीआरएसला सोलापूर शहराचे राजकारण खुणावू लागले आहे. त्यांच्या हाताला जोपर्यंत जनाधार असलेला नेता सोलापुरात लागत नाही, तोपर्यंत बीआरएसला सोलापुरात फारसे राजकीय भविष्य दिसत नाही. (Marathi Tajya Batmya)

Maharashtra Politics
Gautami Patil: गौतमी ही तू आहेस? आईसोबतचा क्यूट फोटो व्हायरल

कै. भारत भालके यांनी आयुष्यभर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेली निष्ठा जोपासली. भगीरथ भालके यांनाच बीआरएसचा लळा लागला कसा? याचे कोडे अनेकांना पडले आहे. बीआरएसला जनशक्ती हवी आहे अन् भालकेंना तूर्तास तरी धनशक्ती हवी आहे. दोघांना या दोन्ही शक्तींची नितांत गरज असल्याने ही गरज पूर्ण करण्यासाठीच बीआरएस अन् भालके हे अनोखे समीकरण जुळल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत पंढरपुरात येऊन दिल्यानंतर अभिजित पाटील यांच्या चर्चेला ब्रेक लावण्याचे काम तूर्तास भालके-बीआरएस यांच्या नव्या समीकरणातून होताना दिसत आहे. (Marathi Tajya Batmya)

Maharashtra Politics
Sharad Pawar: "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल...",शरद पवारांबद्दल पसरलेल्या बातमीवरून राष्ट्रवादी आक्रमक

पंढरपूर-मंगळवेढ्याच्या राजकारणात पक्षापेक्षा व्यक्तीला अन्‌ विचाराला मानणारा मतदार मोठा आहे. हा मतदार कोणाला मानतो? पवारांना की भालकेंना? याचे उत्तर मात्र भालकेविरुध्द राष्ट्रवादी असा सामना झाल्यावरच मिळू शकते.(Latest Marathi News)

कर्नाटक विधानसभेचा निकाल पाहिल्यानंतर भाजपमध्ये जाणाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. तूर्तास भाजप नको अशीच अनेकांची मानसिकता झालेली दिसत आहे. सोलापूरसह महाराष्ट्राच्या राजकारणात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएसने जोरदार तयारी केली आहे. पाठीशी जनशक्ती असलेल्या नेत्यांना तेलंगणातून धनशक्तीचा विश्‍वास मिळताना दिसत आहे. (Marathi Tajya Batmya)

Maharashtra Politics
Nashik Crime News: पंचवटीत किरकोळ वादातून हाणामारी अन् एकाची हत्या...

बीआरएसच्या गळाला माजी महापौर महेश कोठे लागतील, असाच सर्वांचा अंदाज होता. राजकारणात २००९ पासून अस्थिर असलेल्या महेश कोठेंनी आता घड्याळाचा निर्णय करून चांगल्या वेळेची वाट पाहण्यास सुरवात केल्याचे दिसते. बीआरएसची ऑफर कोठेंनी नाकारली, राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांनी मात्र चर्चेचे निमंत्रण तरी तूर्तास स्वीकारले आहे. विधानसभा निवडणुकीला अजून बराच अवधी आहे. त्यामुळे नक्की कोण कोणाचा? याचे उत्तर योग्य वेळ आल्यावरच मिळण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)

- प्रमोद बोडके

Maharashtra Politics
Mumbai Murder Case: क्रूरतेचा कळस! सरस्वतीचे शरीराचे 20 तुकडे शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले अन्...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com