मराठवाडा अतिवृष्टी : मृतांच्या नातेवाईकांना मिळणार मदत - वडेट्टीवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vijay wadettivar

मराठवाडा : मृतांच्या नातेवाईकांना मिळणार मदत - वडेट्टीवार

मुंबई : गुलाब चक्रीवादळाच्या (gulab cyclone) पार्श्वभूमीवर हवामान विभागाने भारताच्या मध्य आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (heavy rain) इशारा दिला आहे. अतिवृष्टीने मराठवाड्यात जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. अतिवृष्टीमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला NDRF च्या निकषा प्रमाणे मदत करण्याच्या सूचना माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettivar) यांनी दिल्या आहेत.

मराठवाड्यात कालपर्यंत 37 जणांचा मृत्यू,

हवामान खात्याने 2 दिवसांमध्ये पाऊस अधिक होणार आहे असा इशारा दिला असून अतिवृष्टीमुळे आतापर्यंत नुकसानग्रस्त भागचे 80% पंचनामे झाले आहेत. शेतकऱ्यांना पिकविमा तातडीने द्यावेत अश्या सूचनाही देण्यात आल्या असून मराठवाड्यात कालपर्यंत यामुळे 37 जणांचा मृत्यू झाला आहे.. अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. यात 4 हजाराहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे..अनेक जनावरे बेपत्ता आहेत..धरण परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पूर परिस्थिबाबत आढावा घेतला जाईल. मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला NDRF च्या निकषा प्रमाणे मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा: शरद पवारांचं नाव घेऊन उभी हयात सत्तेचं केंद्रीकरण केलं

पुढच्या १२ तासात वादळ पश्चिमेच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता असून त्याची तीव्रता कमी होईल असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

loading image
go to top