esakal | MPSC : अजित पवारांनी शब्द पाळला! विद्यार्थी म्हणतात..#ThankYouDada
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

MPSC : अजित पवारांनी अखेर शब्द पाळला! विद्यार्थ्यांमध्ये आनंद

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : एमपीएससी (MPSC exam) परीक्षा देऊन सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा दिलासा दिला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व विभागांच्या सचिवांना त्यांच्या विभागातील रिक्त जागांची माहिती देण्याचे निर्देश अजितदादांनी दिले होते. त्यानुसार एमपीएससी पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर आज (ता.५) प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सोशल मिडियावर हॅशटॅग ट्रेंड ( #ThankYouDada) सुरू करत आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अजित पवारांचा मोठा दिलासा!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) १५ हजार ५११ पदांची भरतीला मान्यता मिळाली आहे. यामुळे आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ५ ऑक्टोबर दुपारी २ वाजल्यापासून पूर्व परिक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर आहे. त्यानुसार गट अ, गट ब व गट क श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात आली आणि 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता मिळाली. आता त्यासाठी जाहिरात कधी निघणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. आज (ता.५) आयोगाने रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. राज्यातील सर्व एमपीएसी विद्यार्थ्यांमध्ये आज आनंदाचे वातावरण आहे. एमपीएसीचा अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी आता अधिक जोमाने अभ्यासाला लागेल. राज्यातील एमपीएससीचा प्रत्येक विद्यार्थी आज म्हणतोय.. #ThankYouDada

कुठंही अडचण न येता पोलिसांनी भरतीचं नियोजन केलं पाहिजे. सैनिकांच्या भरतीत मुला-मुलींना संधी मिळायला पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. एमपीएससीमार्फत भरण्यात येणाऱ्या जागा प्रत्येक विभागाने एमपीएससीला कळवाव्या. त्यासाठी ३० सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर भरती प्रक्रिया सुलभ होईल. संबंधित विभागातून माहिती आल्यानंतर एमपीएससीच्या जाहीराती निघतील, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानुसार ३० सप्टेंपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार लागलीच एमपीएससीकडून १७ संवर्गातील २९० पदांची जाहिरात काढण्यात आली असून माहिती मिळाल्यानंतर केवळ चार दिवसांत एमपीएससीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे अजित पवारांच्या कार्यतत्परतेचा प्रत्यय पुनश्च महाराष्ट्रातील जनतेला आलाय.

loading image
go to top