Uddhav Thackeray: क्राईम ब्रँचकडून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा; काय आहे प्रकरण?

Uddhav Thackeray:
Uddhav Thackeray:esakal
Updated on

राज्यातील सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारी अनेक शपथपत्र बनावट असल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. त्यानंतर मुंबईच्या निर्मलनगर पोलिस ठाण्यात या बनावट शपथपत्र प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचच्या दोन अधिकाऱ्यांचे पथक तीन दिवस कोपरगावमध्ये ठाण मांडून होते. या सर्व चौकशीत ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे. (relief to Thackeray ShivSena from crime branch in fake affidavit Case )

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची कथित बनावट प्रतिज्ञापत्रावरील चौकशी पूर्ण झाली आहे. शपथ पत्रामध्ये काहीही आक्षेपार्य नाही असे मुंबई क्राईम ब्रँचने स्पष्ट केलं आहे. तीन दिवसांच्या कसून चौकशीनंतर कोपगावमध्ये ठाकरे गटाला दिलासा मिळाला.

कोपरगावमधील २०० शपथपत्रांवर आक्षेप घेण्यात आला होता. निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्राईम ब्रँचकडे वर्ग झाल्यानंतर दोन अधिकाऱ्यांचे पथक कोपरगावमध्ये दाखल झाले. त्या अनुषंगाने २०० जणांची क्राइम ब्रँचने तीन दिवस चौकशी करून शहानिशा केली असता शपथपत्रांसंदर्भात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी मधुकर सानप ‌यांनी सांगितलं आहे.

शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निवडणूक आयोगाकडे बनावट कागदपत्र सादर केल्याचा गंभीर आरोप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com