रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार; मंत्री राजेंद्र शिंगणे यांचा छापा

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 11 July 2020

जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुणकारी ठरलेले रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. याबाबत आलेल्या तक्रारी तसेच वृत्त यांची दखल घेत राज्याचे अन्न आणि औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईतील विविध भागात छापा घातला. तसेच अन्न आणि औषध प्रशासनास सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई - जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुणकारी ठरलेले रेमडेसिव्हिर या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. याबाबत आलेल्या तक्रारी तसेच वृत्त यांची दखल घेत राज्याचे अन्न आणि औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईतील विविध भागात छापा घातला. तसेच अन्न आणि औषध प्रशासनास सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज भायखळा येथील वैद्यकीय दुकानावर छापा घातला. कोरोना उपचारात प्रभावी औषध ठरणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी भायखळ्यात जाऊन औषधांची पाहणी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत माध्यमांशी बोलताना डॉ. शिंगणे म्हणाले की, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबजार होत असल्याच्या तक्रारी गेल्या दोन दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनाकडे येत आहेत. काही वृत्तपत्रांमध्येही तक्रारी छापून आल्या होत्या. तर काहींनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात प्रत्यक्ष फोन करुन तक्रारी केल्या होत्या. त्याअनुषंगाने कालपासूनच मुंबई महापालिकेत, रुग्णालयांमध्ये आणि बाजारात हे औषध किती उपलब्ध आहे, याचा आढावा घेतला जात आहे,असे ही शिंगणे म्हणाले.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनची खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार वैद्यकीय दुकानदारांनी रुग्णाचे आधारकार्ड, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि फोन नंबर या आदी सर्व गोष्टींची नोंद करून औषध देणे गरजेचे आहे. या नियमावलीनुसार वैद्यकीय दुकानांचे मालक औषधांची विक्री करतात का?, ते तपासलं जात आहे, असेही शिंगणे यांनी सांगितले. मुंबईतील विविध वैद्यकीय दुकानांत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा किती आहे?. त्यांनी किती रुपयांना इंजेक्शन खरेदी केले. याबाबत माहिती घेतली जात आहे.

‘सध्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. औषध पुरवठादार कंपन्यांनी दोन दिवसात  औषध पुरवण्याच आश्वासन दिले आहे. औषध छापील किंमतीतच विकले गेले पाहिजे. काळाबाजारा व्हायला नको.अन्यथा माझा विभाग आणि गृहविभाग मिळून योग्य ती सक्त कारवाई करू,’’ असा इशारा यावेळी शिंगणे यांनी दिला.

देशभरातच काळाबाजार
मंत्री राजेंद्र शिंगणे यांची शुक्रवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत  बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना साथीत उपयोगी ठरणाऱ्या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी संयुक्त मोहिम आखण्यावर भर देण्यात आला. रेमडेसिव्हिर इंजेक्शन तुटवडा असल्याने हे औषध ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न आणि औषध प्रशासनाकडे आल्या आहेत. रेमडेसीवीररेमडेसिव्हिर औषधांचा काळाबाजार फक्त मुंबईतच नाही तर देशभरात होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने सर्व राज्यांच्या औषध प्रशासनाला याविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले असल्याचे समजते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remdesivir injection black market on raid by minister rajendra shingane