
रायगडावरील राजसदरेवर लावण्यात आलेले बॅरेकेट्स हटवण्यात आले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आता जवळून अभिवादन करता येणार आहे. मात्र, हे करत असताना शिष्टाचार पाळण्याचं आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले आहे.
संभाजीराजे म्हणाले, "आज रायगडच्या राजसदरेवरील बँरिकेटस् पुरातत्त्व खात्याच्या सहमतीने हटविण्यात आले. राजसदरेवर जाऊन महाराजांपुढे नतमस्तक होता यावे, यासाठी सदरेवरील बँरिकेटस् काढावेत, अशी मागणी शिवभक्तांनी अनेक दिवसांपासून केली होती. आज रायगडला भेट दिली असता, यावर तात्काळ निर्णय घेत पुरातत्त्व अधिकाऱ्यांच्या सहमतीने हे बँरिकेटस् हटवण्यात आले. यामुळे राजसदरेवर जाऊन शिवभक्तांना आता महाराजांचे दर्शन घेता येणार आहे."
मात्र, सदरेवर जात असताना शिवभक्तांनी त्या जागेचे पावित्र्य जपण्यासाठी काही शिष्टाचारांचे पालन करणे गरजेचे आहे. जसे की डाव्या बाजूने सदरेवर जाऊन उजव्या बाजूने उतरणे, महाराजांच्या तख्ताच्या जागेपर्यंत न जाणे, सेल्फी न काढणे, सदरेवर शांतता राखणे या गोष्टी प्रामुख्याने पाळल्या पाहिजेत, असं आवाहनही संभाजीराजे यांनी केलं आहे.
तूर्तास सदरेवरील बँरिकेट्स तख्ताच्या बाजूने लावले आहेत. मात्र लवकरच या बँरिकेटचे स्वरूप बदलून ऐतिहासिक धाटणीची संरचना करण्यात येईल. या निर्णयास संमती देऊन पुरातत्त्व विभागाने दाखविलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार, अशी माहितीही खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.