शाळेची घंटा वाजणार! राज्यात 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरू होणार; शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

टीम ई सकाळ
Friday, 15 January 2021

राज्यातील पाचवी ते 8 वीची शाळा सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

मुंबई - कोरोनामुळे बंद करण्यात असलेल्या माध्यमिक शाळेची घंटा आता वाजणार आहे. राज्यातील पाचवी ते 8 वीची शाळा सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार शाळा 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. 

शिक्षण विभागाच्या बैठकीवेळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरु होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना काही सूचनाही दिल्या. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांनी कोरोनाबाबत काळजी घ्यावी असं सांगितलं. राज्यातील शाळा सुरु होणार असल्या तरी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा मात्र पुढचे आदेश येईपर्यंत बंद राहतील असं सागंण्यात आलं आहे. 

मार्च महिन्यात बंद झालेल्या शाळा, महाविद्यालये गेल्या दोन महिन्यापासून हळू हळू सुरू करण्यात आली. यामध्ये 9 पासून वरच्या वर्गातील शाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार कोरोनाचे प्रोटोकॉल पाळून काही नियम आणि अटींसह शाळा, कॉलेज सुरु करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reopen 5 th to 8 th standerd schools from 27 january say education minister varsha gaikwad