politician zp reservation declare
sakal
पुणे-मुंबई - राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले. विविध प्रवर्गांनुसार ठरविण्यात आलेल्या या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी असेल. आठ वर्षांनंतर हा बदल झाला आहे.