esakal | ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुखांच्या निवासस्थानी भाजप नेते; ऋणानूबंध की नव्या राजकारणाची नांदी
sakal

बोलून बातमी शोधा

At the residence of BJP leader senior leader Ganpatrao deshmukh

भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले, सांगोला तालुक्‍यातील जेष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ही भेट राजकारणाच्या पुढे जाऊन असणाऱ्या मैत्रीची भेट होती. विजयदादा व देशमुख साहेब यांचे कायमचे ऋणानुबंध आहेत. आमदार गणपतराव देशमुख हे ज्येष्ठ व सर्वच राजकारण्यांना मार्गदर्शक आहेत. 

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुखांच्या निवासस्थानी भाजप नेते; ऋणानूबंध की नव्या राजकारणाची नांदी

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (जि. सोलापूर) : भाजपच्या नेत्याने सांगोला येथे कार्यक्रमासाठी आल्यानंतर माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून 10 ऑगस्ट रोजी वाढदिवसनिमित्त माजी आमदार देशमुख यांना शुभेच्छाही दिल्या. या भेटीमुळे राजकारणापलीकडील ऋणानुबंध जपल्याची चर्चा होत आहे. ही भेट अनौपचारिक असली तरी अनेक जण आगामी होणाऱ्या निवडणुकांसाठीची वेगळी नांदी तर नाही ना, याचीही चर्चा करत आहेत. 

भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील सांगोला येथे कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन तब्येतीची विचारपूस केली. विजयसिंह मोहिते पाटील व माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे राजकारणा पलीकडील वेगळेच ऋणानुबंध आहेत. प्रथमपासूनच राजकारणापलीकडील मैत्री आजपर्यंत दोघांनीही जपली आहे. हेच ऋणानुबंध कायम ठेवत विजयसिंह मोहिते पाटील सांगोला येथे आले असताना त्यांनी माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याअगोदरही रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आमदारकी स्वीकारल्यानंतर सांगोला येथे आले असता माजी आमदार गणपतराव देशमुख यांची भेट घेतली होती. माजी आमदार देशमुख यांच्या निवासस्थानी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते. ही भेट अनौपचारिक असली तरी अनेक जण आगामी होणाऱ्या निवडणुकांसाठीची वेगळी नांदी तर नाही ना याचीच चर्चा करीत होते. 

संपादन : वैभव गाढवे