Chandrashekhar Bawankule : वाळू धोरण आज जाहीर होणार, बावनकुळे यांची माहिती; २६ पासून अंमलबजावणी
Maharashtra Sand Policy : महाराष्ट्राचे नवीन वाळू धोरण २४ फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. उमरखेड येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली.
यवतमाळ : राज्याचे वाळू धोरण २४ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच दिली. उमरखेड येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना ते माध्यमांशी बोलत होते.