Chandrashekhar Bawankule : अधिकाऱ्यांनो, मानसिकता बदला; बावनकुळे यांचे ताशेरे, महसूल विभागाच्या कार्यशाळेचे उद्‍घाटन

Bureaucratic Corruption : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भ्रष्टाचारावर भाष्य करत, निलंबित अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSakal
Updated on

पुणे : ‘गतिमान आणि पारदर्शी कारभार करताना, काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या पत्रावर सही करताना दुःख होते. त्यांचा प्रस्ताव ‘एसीबी’कडे पाठविण्याची वेळ येते. सर्व मर्यादा पार केल्यावर हे करावे लागते,’’ असे सांगतानाच ‘‘एका तहसीलदाराने जिल्हाधिकाऱ्यापासून सचिवांपर्यंतचे सर्वांचे अधिकार वापरले. २२ लक्षवेधी तहसीलदारावर होतात हे चांगले नाही. तसेच, निलंबित होऊन पुन्हा कामावर येऊ ही मानसिकता बदला,’’ अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी महसूल विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com