Maharashtra Road Accident : रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण ९ टक्के घटलं; शासनाकडे सर्व जिल्ह्यांची आकडेवारी

accident
accidentesakal

मुंबईः राज्यातील रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण ९ टक्के घटल्याची माहिती समोर येत आहे. मागच्या वर्षी सुरुवातीच्या चार महिन्यात जेवढे मृत्यू अपघातात झाले त्या तुलनेत यावर्षीच्या चार महिन्यात मृत्यूचं प्रमाण घटलं आहे.

रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी या कालावधीत प्रवास करणं टाळलं पाहिजे, असं वाहतूक तज्ज्ञांनी स्पष्ट केलं.

accident
Sambhajinagar : पाच वर्षांच्या चिमुरडीसह पती-पत्नीने घेतला गळफास! ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने हळहळ

महत्त्वाचं म्हणजे मुंबई विभागात मृत्यूच्या घटनांमध्ये ४१ टक्क्यांनी घट झाली आहे. मागच्या वर्षी राज्यात जानेवारी ते एप्रिल २०२२ मध्ये १९४ जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. यावर्षी हा आकडा १३० इतका आहे. राज्याचे परिवहन उपायुक्त भरत काळसकर म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यातून डेटा गोळा केल्याने कुठल्या जिल्ह्यात अपघातांचं प्रमाण जास्त आहे, याचा अंदाज आला आणि तिकडे लक्ष केंद्रीत करण्यास मदत होत आहे.

accident
Zakir Naik : झाकीर नाईकमुळे माझा सौरभ 'सलीम' बनला…; दहशतवाद्याच्या पित्याचा खळबळजनक दावा

राज्य शासनाच्या डेटामध्ये अपघाताचे स्थान, कुठल्या वाहनाचा अपघात झाला त्याची माहिती, कशा पद्धतीने अपघात झाला त्याची माहिती, अपघात झाला त्या व्यक्तीचा सर्व तपशील, वाहनांतील दोष याची सर्व माहिती गोळा करण्यात आलेली आहे.

राज्याच्या वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. रविंदर सिंग म्हणाले की, अपघातांना आळा घालण्यासाठी जनजागृती, प्रशिक्षण आणि यंत्रणांची क्षमता वाढण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात रस्ते अपघात आणि मृत्यूचं प्रमाण घटल्याने समाधान व्यक्त होत आहे. मागच्या वर्षीच्या चार महिन्यांच्या तुलनेत यावर्षीच्या चार महिन्यांमध्ये अपघातातील मृत्यूचं प्रमाण ९ टक्क्यांनी घटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com