
राज ठाकरेंआधीच रोहित पवार अयोध्येत; रामलल्लाचं दर्शन घेणार?
नेत्यांचे अयोध्या दौरे हा विषय सध्या राज्यातल्या चर्चेच्या प्रमुख विषयांपैकी एक आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा, धामधूम सध्या सुरू आहे. ५ जून रोजी ते अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र आता चर्चा होतेय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या दौऱ्याची. राज ठाकरेंआधीच रोहित पवार अयोध्येत जात आहेत.
रोहित पवार सध्या सहकुटुंब तीर्थयात्रेला गेले आहेत. या यात्रेदरम्यान काल त्यांनी राजस्थानमधल्या राधा गोविंद मंदिराला भेट दिली. या मंदिराचं, भारतीय इतिहासाचं कौतुक पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केलं आहे. त्यानंतर पुष्करचं ब्रह्म मंदिर, सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा अजमेर इथला दर्गा इथंही रोहित पवारांनी भेट दिली. या ठिकाणी आपण देशाच्या आणि राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं.
चार दिवसाच्या या राजस्थान दौऱ्यानंतर आता रोहित पवार पुढे उत्तर प्रदेश दौऱ्यावर निघाले आहेत. आपल्या परिवारासोबत या दौऱ्यादरम्यान पवार आज सकाळी ११ वाजता अयोध्येत जाणार आहेत.
Web Title: Rohit Pawar Ayodhya Ram Mandir Rajsthan Radha Govind Mandir
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..