पडळकर खूप चांगला अभिनय करतात, रोहित पवार यांची टीका

'पडळकर यांची गेल्या काही दिवसांची भाषण ऐकली तर दगडफेक करा अशीच होती.'
Gopichand Padalkar And Rohit Pawar
Gopichand Padalkar And Rohit Pawaresakal

अहमदनगर : चौंडी (ता.कर्जत) येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भाजपचे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी रोखले. यावरुन पडळकर यांनी शरद पवार व रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका केली. पडळकर यांच्या टीकेला रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. पडळकर खूप चांगला अभिनय करतात. त्यांनी व्यक्तिगत स्टंट केला. (Rohit Pawar Criticize BJP Leader Gopichand Padalkar Politics In Chaundi Of Ahmednagar)

Gopichand Padalkar And Rohit Pawar
ओबीसी आरक्षण वगळून महापालिकांच्या सोडती जाहीर, यात औरंगाबाद का नाही?

त्यांचे थर्ड ग्रेडचे भाषण झाल्याचा टोला पवार यांनी लगावला. पडळकर यांची गेल्या काही दिवसांची भाषण ऐकली तर दगडफेक करा अशीच होती. त्यामुळे पोलिस कारवाई करणारच, असे रोहित पवार म्हणाले. या ठिकाणी ९० टक्के धनगर लोक होती. मग ते पैसे घेऊन आले अस म्हणायचे का, असा सवाल त्यांनी पडळकरांना केला. ज्यांनी बिरोबाची शपथ घेऊन पाळली नाही, त्यांना हिंदू धर्म काय कळला, असा टोला रोहित पवार यांनी त्यांना लगावला.

Gopichand Padalkar And Rohit Pawar
बहुजनांची पोरं आजा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, पडळकरांना रोखलं

शरद पवार आल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहित पवारांनी राजकारण का केले. तुम्ही कशासाठी गालबोट लावले, असा सवाल पडळकर यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com