संजय राऊतांकडून रोहित पवारांची प्रशंसा; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांची प्रशंसा केली आहे. राजकारणात येणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या नव्या पिढीला उत्तेजन दिलं पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई : शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांची प्रशंसा केली आहे. राजकारणात येणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या नव्या पिढीला उत्तेजन दिलं पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षातही एखादा चांगला कार्यकर्ता घडत असेल, तर त्याला घडवण्याच्या प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांनी योगदान दिलं पाहिजे. राजकारणात नवी पिढी उदयाला येत असते, ते कोणत्या पक्षात आहेत, कोणत्या कुटुंबात आहेत, त्यापेक्षा ते कोणत्या प्रकारचं काम करतात हे महत्वाचंअसतं असे म्हणत संजय राऊत यांनी रोहित पवार यांच्या स्तुतीसुमने उधळली आहे. रोहित पवार यांच्या कामाचेही राऊत यांनी कौतुक केले आहे.

आरे कॉलनी वृक्षतोडीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी म्हटले की, स्वतः शिवसेनाही वृक्षसंरक्षक आहे. आम्हीही निसर्गप्रेमी आहोत असे त्यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit pawar is good leader in opposition party says sanjay raut