
'नाईट लाईफ' येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई : बहुचर्चित असा विषय ठरलेल्या 'नाईट लाईफ' येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
रोहित पवार म्हणाले, 'नाईट लाईफ'ला परवानगी देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. याचं संपूर्ण श्रेय माझे मित्र आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना जाते, अशा शब्दांत रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले.
The decision to keep all shops and establishments in gated communities in Mumbai open 24/7 is a welcome step. Currently, 24 hr cafes are in 5 stars. This decision will help the common man and business community alike. pic.twitter.com/A8SnDSpiXZ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 17, 2020
'नाईट लाईफ'च्या मुद्द्यामुळे मुंबईमध्ये वडापावच्या स्टॉलपासून तर हॉटेल, मॉल, दुकाने, मल्टिप्लेक्स हे 24 तास सुरु ठेवता येणार आहेत. सध्या फक्त तारांकित हॉटेलमध्येच कॅफे 24 चालू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु नवीन निर्णयाचा सामान्य जनता आणि उद्योग-व्यावसायिक या दोघांनाही फायदा होईल, असं मला वाटते.