Rohit Pawar: रोहित पवार अडचणीत येणार? आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar

Rohit Pawar: रोहित पवार अडचणीत येणार? आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची शक्यता

शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा टार्गेटवर आले आहेत. अजित पवारांची आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार यांच्यासह 72 संचालकांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

या घोटाळा प्रकरणात अजित पवार आणि रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून कोर्टाकडे परवानगी मागण्यात आली आहे. अजित पवार आणि रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांनी साखर कारखाने विकत घेताना संशयास्पद व्यवहार केल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.

हेही वाचा: Neelam Gorhe: नारायण राणेंच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हेचं प्रतिउत्तर म्हणाल्या हे तर चिंटूचे जोक्स

राज्य सहकारी बँक घोटाळ्यामध्ये ईडीने केलेल्या चौकशीनंतर पवार कुटुंबीशी संबंधित कंपन्यांमधून संशयास्पद लिलावाद्वारे कारखाने खरेदी केले आहेत का किंवा काही व्यवहार झाले आहेत का? यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडूनही तपास केला जाणार आहे. यामध्ये जरंडेश्वर साखर कारखाना आणि रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीमार्फत खरेदी केलेल्या साखर कारखान्यांचा समावेश आहे. दरम्यान कोर्टाने परवानगी दिल्यास आर्थिक गुन्हे शाखेकडून पवार काका-पुतण्याची पुन्हा चौकशी होऊ शकते.

हेही वाचा: Maharashtra Politics : निलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार? मुख्यमंत्री शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल

अजित पवार यांच्याबरोबरच इतर नेत्यांसह एकूण ७५ जणांना दोन वर्षांपूर्वी 'क्लीन चीट' देणाऱ्या मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्या भूमिकेत बदल झाला आहे. आरोपांबाबत फेरतपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती इओडब्ल्यूतर्फे काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आली होती.

टॅग्स :Rohit PawarAjit PawarNCP