राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला परवानगी देऊ नये; सचिन खरात यांची मागणी

धर्माच्या नावाखाली राजकारण- सचिन खरात
राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला परवानगी देऊ नये; सचिन खरात यांची मागणी

महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे सर्व धर्म समभाव मानणारे आहे. धर्माच्या नावाखाली राजकारण (Politics) करणाऱ्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी राज्य सरकारला केली आहे. या सदर्भात त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे.

सचिन खरात यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज ठाकरे वारंवार सामाजिक वक्तव्याच्या नावाखाली धार्मिक वक्तवे करत आहे. आता राज ठाकरे हे औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत परंतु औरंगाबाद (Aurangabad) क्रांतीभूमी आणि नामांतर भूमी आहे. या ठिकाणी सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आणि गुण्यागोविंदयाने राहतात. धर्माच्या नावाखाली राजकारण (Politics) करणाऱ्या राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे सर्व धर्म समभाव मानणारे आहे असेही ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला परवानगी देऊ नये; सचिन खरात यांची मागणी
‘रझा अकादमी'च्या मुद्यावरून नितेश राणेंचा आघाडीवर निशाणा; म्हणाले...

एक मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे जाहीर सभा तर येत्या पाच जून रोजी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह औयोध्याला जाणार आहे असल्याचे राज ठाकरे यांनी पुण्यात सांगितेल. यावेळी ते म्हणाले. ‘‘गेले अनेक वर्ष हा विषय तसाच राहिला आहे. कोणी काही लिहिले नाही, म्हणून मला वाटले त्यावर बोलले पाहिजे. याचा त्रास फक्त हिंदूंनाच होतो आहे, असे नाही. तर मुस्लिम समाजाला देखील होत आहे. देशभरातील सर्व बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा. सध्या रमझान सुरू आहे. मला काही करावयाचे नाही. परंतु, तीन तारखेपर्यंत त्यांना समजले नाही आणि सर्वोच्च न्यायालय आणि कायद्यापेक्षा त्यांना धर्म मोठा वाटत असले, तर जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. मनसेच्यावतीने त्या दृष्टीने सर्व तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com