
नाशिक : नाशिक -त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सहा हजार कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदा अंतिम टप्प्यांत आहेत. या निविदांना लवकरच मान्यता देण्यात येतील. तसेच सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गोदावरी अविरत निर्मळ वाहती ठेवण्यासाठी जलसंपदामंत्र्यांनी चांगली योजना आखली असून त्यालाही मान्यता दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.