
सोलापूर : महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या, नगरपरिषदांवर तीन वर्षांपासून प्रशासकराज आहे. अशातच आता जिल्हा नियोजन समित्या असो की शासकीय महामंडळे, संजय गांधी निराधार समितीसह अन्य शासकीय समित्यांवरील अशासकीय सदस्य देखील अधिकाऱ्यांच्याच हाती आहेत. त्यामुळे कार्यकर्ते नाराज असून अनेकजण पक्षाच्या बैठकांनाच दांडी मारत आहेत. त्यामुळे आमदारांसह शहराध्यक्ष, जिल्हाधिकाऱ्यांची पंचाईत होत आहे.