रूपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह कमेंट करणं भोवलं; तरूणाला अटक

वटपोर्णिमेच्या निमित्ताने रूपाली चाकणकर यांनी आपलं मत मांडलं होतं.
Rupali Chakankar
Rupali ChakankarSakal

सोलापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. वटपोर्णिमेच्या निमित्ताने रूपाली चाकणकर यांनी आपलं मत मांडलं होतं. त्यावर बार्शीतल्या तरूणाने त्यांच्या वक्तव्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

(Rupali ChakanKar Facebook Post)

"मी लग्न झाल्यापासून इकदाही वडाला फेऱ्या मारल्या नाहीत आणि माझ्या नवऱ्याने तसा हट्टही कधी धरला नाही." असं वक्तव्य रूपाली चाकणकर यांनी केलं होतं. या महाराष्ट्राला सत्यवानाची सावित्री कळाली पण ज्योतिबाचा सावित्री कळाली नाही असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बार्शीतील एका तरूणाने आक्षेपार्ह कमेंट केली होती.

Rupali Chakankar
भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; 'मिशन 48'ची घोषणा

दरम्यान चाकणकरांची ही पोस्ट एका फेसबुक ग्रुपवर शेअर करण्यात आली होती आणि त्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया काय आहेत असं विचारण्यात आल्या होत्या. त्यानंतर यावर बार्शीच्या युवराज ढगे नावाच्या तरूणाने आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे यांनी बार्शी शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी युवराज ढगे या तरूणाला ताब्यात घेतलं आहे.

युवराज ढगे या तरूणाविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ५०९ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. "समाज माध्यमांचा वापर जपून करावा, आक्षेपार्ह पोस्ट किंवा कमेंट करू नयेत, तसेच महिलांच्या बाबतीत विशेष जबाबदारी घ्यावी." असं अवाहन बार्शी पोलिसांनी केले आहे.

Rupali Chakankar
मुंबईत 40 लाखांचे ड्रग NCBकडून जप्त; दोघांना अटक

दरम्यान शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी रूपाली चाकणकर यांनाच पत्र लिहून त्यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत तक्रार केली आहे. फेसबुकवर त्यांनी हे पत्र लिहित आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरूणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com