esakal | महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो, दरेकरांना इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो, दरेकरांना इशारा

महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो, दरेकरांना इशारा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली. शिरूर येथे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार क्रांती संघटनेने आयोजिलेल्या राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्यात दरेकर बोलत होते. लावणी कलाकार सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशावर नाव न घेता, दरेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आक्षेपार्ह शब्दात टिपण्णी केली होती. याला महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भाषेत प्रत्त्युत्तर दिलं आहे. आम्ही थोबाड आणि गाल रंगवू शकतो, असा इशारा दरेकरांना चाकणकर यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली. अतिशय अर्वाच्य भाषेत राष्ट्रवादीवर टिपण्णी केली होती. या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे, असल्याचा गंभीर आरोपही दरेकरांनी यावेळी केला. दरेकरांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. दरेकांना महिलांची माफी मागावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. चाकणकर यांनी फेसबूकवर पोस्ट करत दरेकरांना इशारा दिला आहे.

हेही वाचा: गुजरात मॉडेलचा फुगा फुटला, शिवसेनेनं सोडला टीकेचा बाण

प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा चाकणकर यांनी दरेकरांना दिला आहे. प्रवीण दरेकर आपण वरिष्ठांच्या सभागृहातील विरोधीपक्ष नेते आहात. हे वरिष्ठ आणि ज्येष्ठांचं सभागृह आहे. पण, तुमच्या वैचारिकत्ता आणि अभ्यासाशी दूर दूर काही संबंध नाही, असा टोलाही लगावला.

loading image
go to top