रुपाली पाटलांनी पीडित महिलेसह केलं FB लाईव्ह; राहुल शेवाळेंच्या अडचणी वाढणार? : Rahul Shewale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Shewale_Rupali Patil

Rahul Shewale: रुपाली पाटलांनी पीडित महिलेसह केलं FB लाईव्ह; राहुल शेवाळेंच्या अडचणी वाढणार?

मुंबई : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी शेवाळेंविरोधातील एका प्रकरणातील पीडित महिलेला घेऊन फेसबुक लाईव्ह केलं. तब्बल एक तासाच्या या लाईव्हमध्ये पीडितेनं अनेक गंभीर आरोप केले आहेत त्यामुळं शेवाळेंच्या अडचणी वाढल्या आहेत. (Rupali Patal did FB Live with victim girl Rahul Shewale problems may increase)

हेही वाचा: Bharat Jodo Yatra: राहुल गांधी बनले सँटाक्लॉज; भारत जोडो यात्रेत वाटली खास गिफ्ट्स

रुपाली पाटील यांनी केलेल्या फेसबूक लाईव्हमध्ये पीडित महिलेनं खासदार राहुल शेवाळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिनं म्हटलं की, मी दुबईत काम करते या ठिकाणी मला एका खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं. याच्या चौकशीनंतर १५ डिसेंबर रोजी यातून मी निर्दोष सुटले पण मी भारतात येऊन या प्रकरणावर भाष्य करु नये यासाठी माझं मानसिक खच्चीकरण केलं जातंय. २८ एप्रिल २०२१ रोजी मी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पण आत्तापर्यंत खासदार शेवाळेंवर गु्न्हा नोंदवण्यात आलेला नाही. यामध्ये पोलिसांवर दबाव आणला जातोय.

हेही वाचा: Coronavirus: ऑक्सिजन सिलेंडर्स, व्हेंटिलेटर्स तयार ठेवा; केंद्राकडून राज्यांना नवे निर्देश

राहुल शेवाळे आणि मी दोन वर्षे एकत्र राहत होतो. शेवाळेंनी स्वतःच्या कुटुंबाचा विश्वासघात तर केलाच मलाही त्यांनी फसवलं. या प्रकरणात शेवाळे खासदार असतानाही वारंवार माझं शोषण करण्यात आलं, असा आरोपही या पीडित महिलेनं केला. दुबईत कामाला असताना मला एका गुन्ह्यात अडकवलं गेलं पण मी १५ डिसेंबर रोजी यातून निर्दोष सुटले. मी भारतात येऊन शेवाळेंचं पितळं उघडं पाडू नये यासाठी माझं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं.

हेही वाचा: Devendra Fadanvis: 'देवेंद्र फडणवीसजी, जास्त बोलाल तर उपमुख्यमंत्रीपदही जाईल', भाजप नेत्याचा घरचा आहेर

याप्रकरणाबाबत राहुल शेवाळेंच्या पत्नीला सर्वकाही माहिती आहे, माझ्याकडं याचे पुरावे देखील आहेत. जेव्हा वेळ येईल तेव्हा हे पुरावे कोर्टात मी सादर करणार आहे. दुबईत माझा टेक्स्टाईलचा बिझनेस होता पण राहुल शेवाळेंनी माझं करिअर आणि प्रतिमा उद्ध्वस्त केली आहे. माझ्यासोबत जे घडलंय ते इतर कोणाहीसोबत घडायला नको म्हणून मी गेल्या १० महिन्यांपासून लढत आहे.

हे ही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

मला तोंड बंद करण्यासाठी ५ कोटी रुपयांची ऑफर दिली गेली होती. मला जीवेमारण्याची धमकीही देण्यात आली. मी तक्रार देऊनही आत्तापर्यंत राहुल शेवाळेंवर गुन्हा का दाखल झाला नाही? असा सवालही पीडित महिलेनं विचारला आहे.

दिशा सालियान प्रकरणी संसदेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी गंभीर आरोप केल्यानं हा विषय गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चिला जातोय. यानंतर शेवाळेंविरोधातील एक जुनं प्रकरणही समोर आलं आहे. यावरुन आता मोठं घमासान सुरु आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेशही दिले आहेत.