साम टीव्ही महाराष्ट्रात निर्विवाद ‘नंबर १’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

‘सकाळ माध्यम समूहा’चे साम टीव्ही न्यूज चॅनेल सलग दुसऱ्या आठवड्यात सर्व मराठी न्यूज चॅनेल्समध्ये निर्विवाद अव्वल ठरले आहे. बार्क (BARC) या संस्थेच्या ३१ व्या आठवड्याच्या रेटिंगनुसार साम टीव्ही न्यूजने मराठीतील सगळ्या प्रस्थापित न्यूज चॅनेल्सना मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या आठवड्यात २४.९ टक्के प्रेक्षकांची पसंती साम टीव्ही न्यूजला मिळाली आहे. विशेष म्हणजे सर्व मराठी न्यूज चॅनेल्समधील टॉप १०० बातमीपत्रांमध्ये साम टीव्ही न्यूजचे तब्बल ७० कार्यक्रम झळकले आहेत.

मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’चे साम टीव्ही न्यूज चॅनेल सलग दुसऱ्या आठवड्यात सर्व मराठी न्यूज चॅनेल्समध्ये निर्विवाद अव्वल ठरले आहे. बार्क (BARC) या संस्थेच्या ३१ व्या आठवड्याच्या रेटिंगनुसार साम टीव्ही न्यूजने मराठीतील सगळ्या प्रस्थापित न्यूज चॅनेल्सना मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या आठवड्यात २४.९ टक्के प्रेक्षकांची पसंती साम टीव्ही न्यूजला मिळाली आहे. विशेष म्हणजे सर्व मराठी न्यूज चॅनेल्समधील टॉप १०० बातमीपत्रांमध्ये साम टीव्ही न्यूजचे तब्बल ७० कार्यक्रम झळकले आहेत.

इतकेच नाही तर टॉप २० मधील सगळेच्या सगळे कार्यक्रम हे एकट्या ‘साम टीव्ही’चेच आहेत. हा न्यूज चॅनेल्सच्या इतिहासातील नवा विक्रम ठरला आहे.

‘साम टीव्ही’च्या बातमीपत्रांनी जनमानसात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. लोकांच्या प्रश्नांची थेट मांडणी करत व्यवस्थेला त्याचे उत्तर देण्यास भाग पाडणाऱ्या बातम्या हे ‘साम टीव्ही’चे वैशिष्ट्य ठरले आहे. सत्य आणि वस्तुनिष्ठ वार्तांकनामुळे सर्वच वयोगटांतील प्रेक्षकांनी ‘साम टीव्ही’ला पसंती दिली आहे. त्यामुळेच सर्वच मराठी न्यूज चॅनेल्समधील सर्वोत्तम १०० कार्यक्रमांत साम टीव्हीचे तब्बल ७० कार्यक्रम झळकले आहेत.

बातमीमागची बातमी आणि त्यातील सत्य उलगडणं हे साम टीव्हीच्या बातम्यांमधील वेगळेपण आहे. सर्व स्तरावर याची नोंद प्रामुख्याने घेतली गेली आहे.  

साम टीव्हीने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय बातम्यांमधील निष्पक्षता आणि सर्वसमावेशकता ही सामच्या बातम्यांमधील जमेची बाजू आहे, असे मत साम टीव्हीचे चॅनेल हेड नीलेश खरे यांनी व्यक्त केले. 

व्हायरल सत्य, टॉप ५०, ३६ जिल्हे ३६ रिपोर्टर, साम अपेडट, स्पॉटलाइट, आज काय विशेष, महाराष्ट्र एक्‍स्प्रेस, आज दिनांक, सरकारनामा ३६०, मेगा प्राइम टाइम यांसारख्या बातमीपत्रांना प्रेक्षकांची सातत्याने पसंती मिळाली आहे. सर्वच वयोगटांतील प्रेक्षकांमध्ये साम टीव्ही न्यूज लोकप्रिय असल्याचे बार्कच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saam TV Channel number one in maharashtra