Saam TV : 'साम टिव्ही' ला 'मोस्ट व्हॅल्यूड न्यूज पार्टनर ऑफ द इयर' पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saam tv

Saam TV : 'साम टिव्ही'ला 'मोस्ट व्हॅल्यूड न्यूज पार्टनर ऑफ द इयर' पुरस्कार जाहीर

पुणे : गेल्या एक वर्षभरात शेअरचॅट या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मचे 'मोस्ट व्हॅल्यूड न्यूज पार्टनर ऑफ द इयर' हा पुरस्कार 'साम टिव्ही'ला जाहीर करण्यात आला आहे. शेअरचॅट हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म म्हणून नावारुपाला आले आहे. या प्लॅटफाॅर्मवर सर्व भाषेतला मजकूर वापरकर्त्याद्वारे प्रसिद्ध करण्यात येतो. शेअरचॅटच्या माध्यमातून दरवर्षी त्यांच्या विविध विभागांसाठी सर्वोत्कृष्ठ नामांकने जाहीर करण्यात येतात.

हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

या प्रक्रियेत शेअरचॅटच्या माध्यमातून शेअरचॅटवरील युनिक व्ह्यूज, एंगेजमेंट, युनिक शेअर्स, कमेंटस आणि प्रसिद्ध झालेला मजकूर याची गुणवत्ता आणि वाचकांकडून मिळालेला प्रतिसाद याच्या आधारे ही नामांकने ठरविण्यात येतात.

यावर्षीच्या नामांकनांमध्ये 'साम टिव्ही'ला २ कोटी ६० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ३० लाखांहून अधिक वाचकांनी साम टिव्हीच्या कंटेटबाबत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सहा लाखांहून अधिक वाचकांनी साम टिव्हीवर व्हिडिओ तसेच वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला मजकूर शेअर करत 'साम टिव्ही'ला सर्वाधिक शेअर मिळवून दिले आहेत.

टॅग्स :Pune NewsMaharashtra News