Politics: "उंट तिरका चालतो, पण घोड्याची चाल.." अजित पवारांच्या नाराजीवर संजय राऊतांची टिप्पणी !

सर्व फेरबदलांमध्ये अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी नाही.
maharashtra politics
maharashtra politics

saamana editorial on no new role Ajit Pawar

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीमधील विरोधीपक्षनेते अजित पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये धुसफुस पाहायला मिळत आहे. अशात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी दिली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगली. आता या सर्व घडामोडींवर सामना अग्रलेखातून टिप्पणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या २५व्या वर्धापनदिनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद दिलं. तर पक्षातील इतर काही नेत्यांकडे जबाबदाऱ्यांचं वाटप केलं.

मात्र, या सर्व फेरबदलांमध्ये अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. यावरुन तर्कवितर्कांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. याचदरम्यान, ठाकरे गटानं अजित पवारांना डिवचलं आहे.

maharashtra politics
Abdul Sattar News : दिपक गवळी कोण? खंडणी प्रकरणावर कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सारवासारव

"उंट तिरका चालतो, पण घोड्याची चाल.."

अजित पवार यांना नव्या फेररचनेतून वगळले. त्यामुळे ते दिल्लीतील कार्यक्रमातून निघून गेले वगैरे नेहमीच्या कंड्या पिकविण्यात आल्या. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘खिलाडी’ आहेत व राज्याच्या बाहेर पडून काम करण्याचा त्यांचा पिंड नाही. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करावे ही आपलीच सूचना होती असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत व त्यांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेवून आहे असे नेहमीच सांगितले जाते. अडीचेक वर्षांपूर्वी त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी केल्याचा हा परिणाम. अजित पवार हे भाजपच्या तंबूत जाऊन परत आले हा त्यांच्यावर ठपका आहे व हा ठपका कायमचा दूर करण्यासाठी अजित पवारांनाच शर्थ करावी लागेल.

maharashtra politics
Maharashtra Politics: शिंदे गटातील पाच मंत्र्यांवर टांगती तलवार; गच्छंतीसाठी भाजपचा दबाव?

राजकारणातल्या विश्वासार्हतेला सध्या कमालीची घरघर लागली आहे. सकाळी या पक्षात असलेला नेता संध्याकाळी कोठे विलीन झालेला असेल ते सांगता येत नाही. काही लोक यास राजकीय बुद्धिबळाचा पट समजतात. उंट तिरका चालतो, पण या पटावर त्यास घोडय़ाप्रमाणे अडीच घरेही जबरदस्तीने चालवले जाते. अशा प्रकारच्या राजकारणाचा लोकांना कंटाळा आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके तेच घडत आहे.

याच राजकारणात शरद पवार व त्यांचा पक्ष हे एक महत्त्वाचे घटक आहेत हे नक्कीच मान्य करावे लागेल व त्यामुळेच भविष्यातील राजकारणाचा विचार करून शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही प्यादी हलवली आहेत. असे मत ठाकरे गटाने मांडले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com