Saamana : विजयाची मशाल राजकीय चिता पेटवत राहील; अग्रलेखात फडणवीसांना कंसमामाची उपमा

निवडणुकीत मशालीचा विजय झाला आणि त्यामुळे मिंधेगट आणि त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
Devendra Fadnavis and uddhav thackeray
Devendra Fadnavis and uddhav thackerayDevendra Fadnavis and uddhav thackeray
Updated on

अंधेरीची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. या निवडणुकीत या गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. पण यानिमित्ताने आता नोटाचा प्रचार केल्याप्रकरणी भाजपावर सातत्याने टीका केली जात आहे. कारण यामध्ये नोटाला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली आहे.

Devendra Fadnavis and uddhav thackeray
Uddhav Thackeray on Andheri Elelction : ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

याच पार्श्वभूमीवर आजच्या सामनामधून भाजपावर कठोर टीका करण्यात आली आहे. तर देवेंद्र फडणवीसांना या अग्रलेखात कंस मामाची उपमा देण्यात आली आहे. या निवडणुकीत मशालीचा विजय झाला आणि त्यामुळे मिंधेगट आणि त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. शिवाय शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून ठेवण्याचं काम कंसमामाने केलं असं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Devendra Fadnavis and uddhav thackeray
Andheri Election : 'या' 5 कारणांमुळे ऋतुजा लटकेंचा विजय

आम्ही समोर वार करणारे आहोत, पण शत्रूने वार वर्मी बसण्याआधीच रणातून पळ काढला. अशा पळपुट्यांनी विजयी मशालीवर उगाच गुळण्या टाकण्याचा प्रयत्न करू नये. विजयाची मशाल अशीच पेटत राहील, विरोधकांची बुडे जाळत राहील; राजकिय चिता पेटवत राहील, असंही सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात लिहिलं आहे. तसंच राज्याची जनता आज पुन्हा दिवाळी साजरी करत आहे, असंही सामनामध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com