Sachin Sawant I इंधनवाढीनं जनतेचं कंबरड मोडलंय अन् मोदी सरकार म्हणतंय 'द कश्मीर फाईल्स' बघा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Political

व्हिडिओतील हा सीन व चित्रपटाचे नाव मोदी सरकारसाठीही चपखल बसणारा

इंधनवाढीनं जनतेचं कंबरड मोडलंय अन् मोदी सरकार म्हणतंय 'द कश्मीर फाईल्स' बघा

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचं एक ट्विट चांगलचं चर्चेत आलं आहे. इस्त्रायल दुतावासातील अधिकारी कोबी शोशानी (Kobi Shoshani) हे भारतीय चित्रपटांचे चाहते आहेत. त्यांनी जयंत पाटील यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी शोशांनी यांनी जयंत पाटील यांना दोन बॉलिवूड चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. यानंतर जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही त्यांच्या ट्वीटला उत्तर देत 'अशी ही बनवाबनवी' पाहण्याचा सल्ला दिला. दरम्यान, आता यावरून कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनी ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे.

हेही वाचा: पुढील तीन ते चार दिवसांसाठी महाराष्ट्रात उष्णतेची लाट - IMD

ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणतात, जयंत पाटील यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओतील हा सीन व चित्रपटाचे नाव मोदी सरकारसाठीही चपखल बसणारा आहे. राज्यातील जनता-पेट्रोल डिझेल दरवाढीने कंबर मोडली आहे. आणि मोदी सरकार द काश्मीर फाइल्स बघा, (The Kashmir Files) असे म्हणत आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. आता त्यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजप आणि कॉंग्रेस वाद वाढणार का अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जयंत पाटील ट्वीटमध्ये म्हणालेत, तुम्ही सुचवलेले चित्रपट पाहण्यासाठी मी नक्कीच वेळ काढेन. बॉलिवूड चित्रपटांवरील तुमचे प्रेम खरोखरच भुरळ पाडणारं आहे. तुम्ही मराठी चित्रपटदेखील पाहा अशी मी शिफारस करतो असेही ते म्हणाले. या व्हिडिमध्ये इस्रायलचा संदर्भ असल्याचे यावेळी जयंत पाटील त्यांनी सांगितले.

Web Title: Sachin Sawant Criticize To Pm Modi The Kashmir Files Movie See

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..