Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने संपवलं जीवन; जळगावच्या जामनेर येथील घटना

प्रकाश कापडे हे मागच्या काही दिवसांपासून जळगावमध्ये आले होते. त्यांच्या आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पोहोचली आणि लोकांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
Prakash kapde
Prakash kapdeEsakal

मुंबईः माजी क्रिकेटपटू सचिन तेडुलकरकडे अंगरक्षक म्हणून काम करणाऱ्या एका एसआरपीएफ जवानाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्रकाश कापडे असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे. त्यांचं वय ३७ वर्षे इतकं होतं. मागच्या काही दिवसांपासून ते सचिन तेंडुलकर यांच्याकडे बॉडीगार्ड म्हणून कामकत होते. बुधवारी पहाटे त्यांनी आत्महत्या केली.

प्रकाश यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. सचिन तेंडुलकर यांच्यापूर्वी त्यांनी मंत्री छगन भुजबळ, नारायण राणे यांच्याकडेही काम केलेलं होतं. प्रकाश कापडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुले, बहीण, भाण असा परिवार आहे.

Prakash kapde
lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

प्रकाश कापडे हे मागच्या काही दिवसांपासून जळगावमध्ये आले होते. त्यांच्या आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पोहोचली आणि लोकांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

जामनेर शहरातील जळगाव रोडवरील गणपती नगरमध्ये प्रकाश कापडे हे वास्तव्याला होते. त्यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. प्रकाश कापडे हे SRPF मध्ये भरती झाले होते. सध्या त्यांची पोस्टिंग मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांचे बॉडी गार्ड म्हणून होती.

रात्रीच्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com