सदाभाऊ खोतांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री; म्हणाले, उद्धव ठाकरे बिळातून बाहेर या.... Sadabhau Khot | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadabhau Khot,Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तरी महालातून बाहेर या आणि जनतेचे प्रश्न समजून घ्या. प्रत्येकवेळी बिळात जाऊन बसता.

सदाभाऊंच्या निशाण्यावर मुख्यमंत्री; म्हणाले, बिळातून बाहेर या....

कोरोना आला, मास्क लावा, घरात बसा आणि पळ काढा. याला वाघ म्हणत नाहीत. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो. तुमच्यात वाघाचा एकही गुण नाही. अशी टिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर रयत क्रांती संघटनेते नेते आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निशाणा साधला. आज सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले,आम्ही खरा वाघ बघण्यासाठी अधिवेशनात येणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तरी महालातून बाहेर या आणि जनतेचे प्रश्न समजून घ्या. प्रत्येकवेळी बिळात जाऊन बसता. आम्ही खरा वाघ पाहायला अधिवेशनात येणार आहोत असा सावध इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.

सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत टिका केली आहे. ते म्हणाले, मागील २० वर्षापासून गुजरात मध्ये "व्हायब्रंट गुजरात" हे कार्यक्रम आयोजित केले जाते. महाराष्ट्रमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये "मॅग्नेटिक महाराष्ट्र" याचे आयोजन करण्यात येत होते. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना कोणी अडवलं. असंही ते म्हणाले.

हेही वाचा: शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा गांधीजींही प्रेरित ;राष्ट्रपती

हिवाळी अधिवेशनावरून राजकारण चांगलेच तापत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. या सरकारची मानसिकता अधिवेशन घ्यायची दिसत नाही. प्रश्नाला सामोरे जाण्याची तयारी दिसत नाही. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

पुढे ते म्हणाले होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विमानातून प्रवास करण्यास मनाई करण्यात आल्याने यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. राज्याचं हिवाळी अधिवेशन फक्त पाच दिवसांचं करण्यात येणार आहे. या सरकारची मानसिकता अधिवेशन घ्यायची दिसत नाही. प्रश्नाला सामोरे जाण्याची तयारी दिसत नाही. परंतु, माझ्या आग्रहानंतर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं होतं.

Web Title: Sadabhau Khot Criticism Uddhav Thackeray Sangli Atpadi Political Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top