यांच नाव काय दारिद्र्य रेषेत आहे? घोडेबाजार शब्दावरुन सदाभाऊ संतापले

Sadabhau Khot critisize shivena sanjay raut over accusation of hoursr trading of mla
Sadabhau Khot critisize shivena sanjay raut over accusation of hoursr trading of mla

राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप केले झात आहेत, ज्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या दरम्यान घोडेबाजारच्या चर्चांना देखील उत आला आहे. यातच सदाभाऊ खोत यांनी घोडेबाजारावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. (Sadabhau Khot critisize shivena sanjay raut over accusation of hoursr trading of mla)

सदाभाऊ खोत यांनी घोडेबाजार या शब्दावर आक्षेप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 'मला एक प्रश्न पडतो की हे जागतिक दर्जाचे प्रवक्ते यांचं नाव काय दारिद्र्य रेषेत आहे की काय? दुसऱ्याकडे यांना पैसा दिसत आहे. हे काय मंत्रालयाच्या समोर कटोरा घेऊन उभे राहिले आहेत? अरे पैसे मोजायच्या मशिन कोणाकडे आहेत? तुमच्याकडे सापडल्या. कारण पैसा तुमच्याकडे आहे, आमच्याकडे पैसा असता तर, आमच्याकडे चार दोन मशिनी सापडल्या पाहिजे होत्या असे त्यांनी संजय राऊतांना सुनावलं आहे.

ते म्हणाले की, असा आमदाराचा अपमान करू नका, ते तीन- साडेतीन लाख लोकांचे प्रतिनिधी असतात, तुम्ही त्या मतदारसंघातील जनतेचा अपमान करत असता याचं भाण ठेवा, असे खोत म्हणाले.'

Sadabhau Khot critisize shivena sanjay raut over accusation of hoursr trading of mla
भाजपची मोठी कारवाई! नुपूर शर्मा, नवीन जिंदाल निलंबित

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मविआचे सर्व उमेदवार आरामात निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. घोडेबाजाराबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांचे घोडे त्यांचा बाजारात असे म्हणत त्यांनी आम्हाला बाजारात उभं राहायची गरज नाही. आम्हाला पुन्हा बळ दाखवण्याची संधी मिळाली असल्याचे राऊत म्हणाले होते. दरम्यान आज राज्यसभेच्या निवडणुकीचं पूर्वनियोजन आम्ही केलं असून आमचा तिसरा उमेदवार जिंकणारचं आणि शिवसेनेच्या संजयचा पराभव होणारच हे स्पष्ट आहे, असे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

Sadabhau Khot critisize shivena sanjay raut over accusation of hoursr trading of mla
राज्यात कोरोनाची चौथी लाट? मास्क सक्तीबाबत आदित्य ठाकरे म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com