Sadanand Date : दहशतवादी कसाबला भिडणारे सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवीन पोलिस महासंचालक!

Sadanand Date Maharashtra DGP : राज्य सरकारकडून यासंदर्भात औपचारिक आदेश जारी केला गेला आहे. सदानंद दाते हे सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची जागा घेणार आहेत.
Sadanand Date takes charge as the new Director General of Police after his appointment by the Maharashtra Government.

Sadanand Date takes charge as the new Director General of Police after his appointment by the Maharashtra Government.

sakal

Updated on

Sadanand Date Appointed as Director General of Police:  महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती केली आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात औपचारिक आदेश जारी केला गेला आहे. सदानंद दाते हे सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची जागा घेणार आहेत.

रश्मी शुक्ला  यांचा कार्यकाळ आज (३१ डिसेंबर) संपत आहे. ही नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा महाराष्ट्राला अंतर्गत सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

सदानंद दाते हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि ते महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात अनुभवी अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. अलीकडेच, केंद्र सरकारने त्यांच्या मूळ कॅडर, महाराष्ट्रात परत येण्यास मान्यता दिली, ज्यामुळे त्यांना पोलीस महासंचालक होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी राज्य आणि केंद्रीय पातळीवर अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

Sadanand Date takes charge as the new Director General of Police after his appointment by the Maharashtra Government.
Zomato Swiggy Latest News : ‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला

महाराष्ट्रातील त्यांच्या कार्यकाळात, सदानंद दाते यांनी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांनी मुंबईतील सह पोलिस आयुक्त आणि सह पोलिस आयुक्त (गुन्हे) ही अतिशय महत्त्वाची पदेही भूषवली आहे. तसेच त्यांनी मीरा-भाईंदर-वसई-विरार प्रदेशाचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com