भगवा ध्वज माझा पहिला गुरु : मुख्यमंत्री

टीम ई-सकाळ
बुधवार, 19 जून 2019

आढळराव-पाटील शिवसेनेच्या उपनेतेपदी

शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली. याबाबतची घोषणा या कार्यक्रमात झाली.

मुंबई : आपण सगळे भगव्याला मानणारी लोकं आहोत. माझी पहिली गुरूदक्षिणा भगव्यासाठी आहे. भगवा ध्वज माझा पहिला गुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच आम्ही दूर कधी गेलो नाही. जो तणाव होता तो दूर केला, असेही ते म्हणाले. 

शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह सेनेचे अनेक नेतमंडळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजप-सेनेत मागील काही दिवसांपूर्वी ताणतणाव होता. मात्र, आम्ही दूर कधी गेलो नाही. जो तणाव होता तो दूर केला. वाघ-सिंहाची जोडी जेव्हा जवळ येते तेव्हा जंगलात कोण राज करणार हे समोर येते. आमचे हिंदुत्व संकुचित नाही. आमचा पहिला गुरु भगवा ध्वज आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, देश आणि राज्याच्या हितासाठी आमची युती आहे. आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यानुसार राज्य सरकार काम करत आहे. आम्हाला सत्ता पदासाठी नको.

लोकसभेत मिळालेले यश अभूतपूर्व

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राला मिळालेले यश अभूतपूर्व आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे शिवसैनिक हेच यशाचे खरे शिल्पकार आहे. आता विधानसभेतही मोठे यश मिळणार आहे. इतिहासात झाला नाही तसा विजय यंदाच्या विधानसभा निवडणुकीत व्हायला हवा. 

आढळराव-पाटील शिवसेनेच्या उपनेतेपदी

शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली. याबाबतची घोषणा या कार्यक्रमात झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saffron Flag is My first guru says Devendra Fadnavis