
Sagar Suresh Dhas: भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या भरधाव गाडीने नितीन शेळके यांचा जीव घेतला आहे. सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जातेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर सागर धसची मेडिकल टेस्ट करण्यात आली होती. मात्र अद्यापही त्याचे रिपोर्ट आलेले नाहीत. महत्त्वाचं म्हणजे त्याला अटक करुन लगेच सोडूनही देण्यात आलं.