सोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णींना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनाली नवांगुळ आणि मंजुषा कुलकर्णींना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

सोनाली नवांगुळ आणि मंजुषा कुलकर्णींना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे: यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार सोनाली नवांगुळ यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच मंजुषा कुलकर्णी यांच्या 'प्रकाशवाटा' या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी देखील साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

हेही वाचा: Podcast : स्विगी-झोमॅटोवर होणार GSTचा परिणाम ते पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

कोण आहेत सोनाली नवांगुळ?

  • सोनाली प्रकाश नवांगुळ यांचं मूळ गाव बत्तीस शिराळा आहे. त्या वयाच्या नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने पॅराप्लेजिक झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी घरातच राहून पदवीपर्यंतच्या परीक्षा दिल्या.

  • २००० साली कोल्हापुरात आल्यानंतर 'हेल्पर्स ऑफ दि हॅंडिकॅप्ड' या संस्थेत २००७ पर्यंत सोशल वर्कर म्हणून काम केलं आहे.

  • २००७ साली अपंग असूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात उतरण्याचा निर्णय घेऊन त्या संस्थेतून बाहेर पडल्या.

  • सोनाली नवांगुळ या भारतातल्या ‘स्पर्शज्ञान’ नावाच्या पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिकाच्या २००८ पासून उपसंपादक असून ‘रिलायन्स दृष्टी’ या ब्रेल पाक्षिकासाठी सातत्याने लेखन करतात.

  • मुक्त पत्रकार म्हणून विविध नियतकालिकांमध्ये विविध विषयांवर लिहितात.

  • अनुवादक व निवेदिका म्हणूनही त्या काम करतात.

  • आणखी दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

  • सोनाली यांनी २०१४ मध्ये पुणे येथे झालेल्या ‘अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद भूषविले आहे.

loading image
go to top