साहित्य संमेलनाचा वाद निरर्थक- मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 जानेवारी 2019

अ. भा. मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा सर्वस्वी निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकच घेत असतात, त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई- अ. भा. मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा सर्वस्वी निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकच घेत असतात, त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
 
यवतमाळ येथे आयोजित अ.भा. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्याच्या आणि नंतर ते परत घेण्याच्या नाट्यावरुन वाद उभे केले जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यांनी काढलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, राज्य सरकारला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न सुध्दा काही माध्यमे करीत आहेत.  अ.भा. साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये मा. मुख्यमंत्री अथवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

साहित्य संमेलनांमधून सरकारांवर/समाजातील निरनिराळया विषयांवर मते नेहमीच व्यक्त केली जात असतात. त्या मतांकडे सरकारसुध्दा सकारात्मकपणेच पाहत असते. त्यामुळे अकारण ज्या विषयांचा संबंध नाही, तेथे राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्न करु नये असेही या पत्रामधून सांगण्यात आले आहे.

Web Title: Sahitya Mahamandal Dispute In Maharashtra is meaningless says Cm