राज्यातील तरुणींना सौंदर्यवती होण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

 महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, एक सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

पुणे - महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, एक सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून, बुधवारपासून  (ता. २२) नावनोंदणीला सुरुवात झाली आहे. ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील तरुणींना मॉडेलिंग व मनोरंजनाच्या अनेक क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळते; मात्र निमशहरी, ग्रामीण भागातील तरुणींमध्ये गुणवत्ता असूनही त्यांना संधी मिळत नाही. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील दर्जेदार गुणवत्ता समोर येणार असून, त्यांच्या सर्वांगीण विकासाचा हेतूही साध्य होणार आहे. ही स्पर्धा १८ ते २५ वयोगटातील अविवाहित तरुणींसाठी असून, नावनोंदणी विनामूल्य आहे. त्यासाठी http://thesakalbeauty.com येथे इच्छुकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. नावनोंदणीनंतर स्पर्धकांची योग्यता पाहून त्यांना ई-मेलद्वारे ऑडिशनसाठी बोलविण्यात येईल. 

या स्पर्धेच्या राज्यात आठ विविध केंद्रांवर ऑडिशन्स घेतल्या जातील. त्यानंतर तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. त्यांचे ट्रेनिंग व ग्रुमिंग पुण्यात करण्यात येईल व अंतिम फेरीही पुणे येथेच होणार आहे.

प्रवेशासाठी पात्रता
    स्पर्धक महाराष्ट्रातीलच राहणारी असावी.
    स्पर्धकाचे वय १ जानेवारी २०२० ला १८ ते २५ वर्षे असावे. 
    स्पर्धकाची उंची कमीत कमी ५.५ इंच किंवा अधिक असावी.
    स्पर्धक अविवाहित असावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal beauty of maharashtra 2020 competition