
Sakal Digital Wins Prestigious WAN-IFRA Gold Award ‘सकाळ डिजिटल’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आपल्या दर्जेदार, विश्वासार्ह अन् निष्पक्ष वार्तांकनामुळे वाचकांच्या पसंतीत अव्वल स्थान पटकावल्यानंतर आता ‘वॅन - इफ्रा’च्या (WAN-IFRA) जागतिक पातळीवरील डिजिटल मीडिया पुरस्कारांमध्ये ‘सकाळ डिजिटल’ने थेट सुवर्ण पारितोषिक पटकावत आपली मोहर उमटवली आहे.