Tulajapur Band I सकल मराठाकडून तुळजापूर बंदची हाक; संभाजीराजेंचा अवमान प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhajiraje Chhatrapati

तुळजाभवानी मंदिर आणि छत्रपती घरण्याचं विशेष नातं राहिलं आहे.

सकल मराठाकडून तुळजापूर बंदची हाक; संभाजीराजेंचा अवमान प्रकरण

राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हे सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्‍यात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं. याप्रकरणी तुळजापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा झाली. संभाजीराजेंना अशा प्रकारची वागणूक दिल्याप्रकरणी प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. (tulajapur band sambhajiraje chhatrapati)

संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मंदिरात गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्याने परिसरात खळबळ उडाली. त्यामुळे ग्रामस्थ आणि मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी, मंदिर तहसीलदार आणि व्यवस्थापक यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. तुळजाभवानी मंदिर आणि छत्रपती घरण्याचं विशेष नातं राहिलं आहे. मात्र पुरातत्त्व विभागाच्या एका निर्णयामुळे त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून थांबवण्यात आलं आहे.

हेही वाचा: प्रकाश आंबेडकरांना आठवलेंची ऑफर, म्हणाले तुमच्या नेतृत्वाखाली काम..

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळ कवायतमध्ये एक नियम आहे. मूर्तीची झीज होत असल्याने त्याच्या संवर्धनासाठी गाभाऱ्यात जाण्यास बंदी घातली आहे. याआधीही अनेक लोकप्रतिनिधींना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखलं आहे. तेव्हाही वाद झाले आहेत. मात्र तुळजाभवानी आणि कोल्हापूर यांचं नांत वेगळं आहे. परंतु ही घटना घडली तेव्हा वाद सामंजस्याने मिटेल असे बोलले जात होते. यानंतर मंदिर संस्थांच्या वतीने दिलगिरीही व्यक्त करण्यात आली आहे. मात्र ही भूमिका पुरेशी नसल्यानं आज सकल मराठा समाजामार्फत तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीराजे सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. संध्याकाळच्या सुमारास ते कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेले. तिथे त्यांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारण्यात आला. कुठलासा नियम सांगत व्यवस्थापनाने संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला. राजेंना प्रवेश नाकारल्यापासून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

हेही वाचा: शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन, दुबईत हृदयविकाराचा झटका

Web Title: Sakal Marathi Samaj Announced Tulajapur Band Sambhajiraje Chhatrapati No Entry In Temple

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top