
मुंबई : ‘सकाळ माध्यम समूहा’ने ८ आणि ९ मार्च रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे श्री गुरू पादुका दर्शन उत्सव आयोजित केला असून, एकाच छताखाली २१ श्री गुरूंच्या मूळ पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या उत्सवादरम्यान रविवारी (ता. ९) सकाळी ९ वाजता आध्यात्मिक मार्गदर्शक श्री एम यांचे व्याख्यान होणार आहे.