
पुणे : ‘चित्र’ म्हणजे खरंतर चित्र काढणाऱ्यांच्या मनातील गोष्ट. आपल्याला आवडलेल्या विषयावर आधारित एक गोष्टीची रचना करायची अन् ती रेषा-रंगांद्वारे व्यक्त करायची. होय अशा पद्धतीने राज्यभरातील लाखो शालेय विद्यार्थ्यांनीच नव्हे, तर महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिक यांनीही ‘सकाळ एनआयई चित्रकला स्पर्धे’त उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होत आबालवृद्धांनी आपले भावविश्व चित्रांच्या माध्यमातून रेखाटण्याचा मनसोक्त आनंद घेतला.