‘सकाळ’ची वाचकसंख्या १ कोटी ४६ लाखांवर! पुणे शहरासह जिल्ह्यात ‘सकाळ’ नंबर वन

Sakal number one inthe district including Punecity Sakal readership 1crore 46lac
Sakal number one inthe district including Punecity Sakal readership 1crore 46lac
Updated on

पुणे - इंडियन रीडरशिप सर्व्हेच्या (आयआरएस) ताज्या अहवालानुसार ‘सकाळ’ची महाराष्ट्रातील एकूण वाचकसंख्या आता एक कोटी ४६ लाख ६१ हजारांवर पोहोचली आहे. ‘सकाळ’ची वाचकसंख्येतील वाढ ५.०२ टक्के आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे जिल्ह्यात ‘सकाळ’ने ४२ लाख ९८ हजार एकूण वाचकसंख्येसह निर्विवाद अव्वल स्थान कायम ठेवले आहे. ‘आयआरएस’मध्ये पुणे जिल्हा क्षेत्रात पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहर क्षेत्रांसह जिल्ह्याचा समावेश होतो. पुणे शहर क्षेत्रातील आवृत्तीतही २२ लाख ९३ हजार एकूण वाचकसंख्येसह ‘सकाळ’ पहिल्या क्रमांकावर आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सामाजिक-आर्थिक दर्जानुसार होणाऱ्या वर्गवारीमध्ये (National Consumer Classification System - NCCS) अती उच्च दर्जाच्या किंवा एनसीसीएस-ए१मध्ये ‘सकाळ’ने महाराष्ट्रात ९ लाख २१ हजार एकूण वाचकसंख्या नोंदविली आहे. महाराष्ट्रात एनसीसीएस-ए१ श्रेणीत एकूण वाचकसंख्येत ‘सकाळ’ पहिल्या क्रमांकावर आहे. कोणतीही सेवा अथवा उत्पादने यांच्या जाहिरातींसाठी वाचकांची सामाजिक-आर्थिक वर्गवारी अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

GMRT Telescope Leads to Discovery of Five New Pulsars in Ancient Galactic Clusters
Latest Marathi News Live Update
Just 15 Days Before Leave, Soldier Arjun Jadhav Attains Martyrdom in Uri Sector
Farmer
Marathi News Esakal
www.esakal.com