‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’ची नामांकने जाहीर

Sakal-Premier-Awards
Sakal-Premier-Awards

‘सकाळ प्रीमियर’ पुरस्काराचा रंगारंग कार्यक्रम २६ डिसेंबरला पुण्यात
मुंबई - गेले कित्येक दिवस उत्सुकता लागलेल्या ‘सकाळ प्रीमियर ॲवॉर्ड’ची नामांकने जाहीर झाली आहेत. ‘आनंदी गोपाळ’, ‘खारी बिस्कीट’ आणि ‘बाबा’ या मराठी चित्रपटांना सर्वाधिक नामांकने आहेत. महेश मांजरेकर यांच्या ‘पांघरूण’ या चित्रपटाला स्पेशल ज्युरी ॲवॉर्ड देण्यात येणार आहे, तसेच ‘ठाकरे’ या चित्रपटाला ‘बेस्ट इन्स्पिरेशनल फिल्म’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अनेक तारे-तारकांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा ‘ॲमनोरा द फन हॉटेल्स अँड क्‍लब’, हडपसर-पुणे येथे होणार आहे.

विविध विभागांतील नामांकने अशी आहेत.
१) सर्वोत्कृष्ट चित्रपट -
 बाबा, माईघाट : क्राइम नंबर १०३/२००५, वेलकम होम, आनंदी गोपाळ, कोती.

२) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राज गुप्ता (बाबा), अनंत महादेवन (माईघाट : क्राइम नंबर १०३/२००५), समीर विध्वंस (आनंदी गोपाळ), विक्रम फडणीस (स्माइल प्लीज), मृणाल कुलकर्णी (ती अँड ती).

३) सर्वोत्कृष्ट अभिनेता - भाऊ कदम (नशीबवान), अंकुश चौधरी (ट्रिपल सीट), स्वप्नील जोशी (मोगरा फुलला), ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ), सागर देशमुख (भाई : व्यक्ती की वल्ली भाग २), ऋत्विक केंद्रे (सरगम).

४) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सई ताम्हणकर (कुलकर्णी चौकातला देशपांडे), मुक्ता बर्वे (स्माइल प्लीज), उषा जाधव (माईघाट : क्राइम नंबर १०३/२००५), सोनाली कुलकर्णी (हिरकणी), मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर).

५) सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - उपेंद्र लिमये (सूर सपाटा), मंगेश देसाई (जजमेंट), चित्तरंजन गिरी (बाबा), प्रथमेश परब (टकाटक), संजय नार्वेकर (ये रे ये रे पैसा २).

६) सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - नीना कुलकर्णी (मोगरा फुलला), प्रार्थना बेहरे (ती अँड ती), हेमांगी कवी (बंदिशाळा), स्पृहा जोशी (वेलकम होम), सविता प्रभुणे (मिस यू मिस्टर).

७) सर्वोत्कृष्ट बालकलाकार - अद्वेश मुडशिंगकर (कोती), आर्यन मेंघजी (बाबा), आदर्श कदम (खारी बिस्कीट), समय तांबे (पिकासो).

८) सर्वोत्कृष्ट कथा - राजेश दुर्गे (कोती), अनंत महादेवन (माईघाट : क्राइम नंबर १०३/२००५ ), मनीष सिंग (बाबा).

९) सर्वोत्कृष्ट पटकथा - उपेंद्र सिधये (गर्लफ्रेंड), राज गुप्ता (बाबा), विक्रम फडणीस आणि इरावती कर्णिक (स्माइल प्लीज)

१०) सर्वोत्कृष्ट संवाद - इरावती कर्णिक (आनंदी गोपाळ), रत्नाकर मतकरी (भाई : व्यक्ती की वल्ली भाग २), सुमित्रा भावे (वेलकम होम).

११) सर्वोत्कृष्ट गीतकार - मंगेश कांगणे (बाबा - अडगुल मडगुल), वैभव जोशी (आनंदी गोपाळ - आनंदघना), क्षितिज पटवर्धन (खारी बिस्कीट - तुला जपणार आहे).

१२) सर्वोत्कृष्ट संगीतकार - रोहन-रोहन (स्माइल प्लीज), रोहित राऊत (मोगरा फुलला), जसराज, सौरभ आणि ऋषीकेश (आनंदी गोपाळ).

१३) सर्वोत्कृष्ट गायक - रोहित राऊत (मोगरा फुलला - मनमोहिनी), आदर्श शिंदे (खारी बिस्कीट - तुला जपणार आहे), अवधूत गुप्ते (ठाकरे - आपले साहेब ठाकरे ठाकरे). 

१४) सर्वोत्कृष्ट गायिका - मधुरा कुंभार (हिरकणी - जगणं हे न्यारं झालं जी), रोंकिनी गुप्ता (खारी बिस्कीट - तुला जपणार आहे), केतकी माटेगावकर आणि शरयू दाते (आनंदी गोपाळ - रंग माळियेला).

१५) सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - नरेंद्र भिडे (हिरकणी), विजय गावंडे (बंदिशाळा), अभिनय जगताप आणि क्षितिज रथ (सूर सपाटा). 

१६) सर्वोत्कृष्ट संकलक - अभिजित देशपांडे (भाई : व्यक्ती की वल्ली भाग २), फैजल आणि इमरान (गर्लफ्रेंड), अपूर्वा मोतीवाले आणि आशिष म्हात्रे (खारी बिस्कीट).

१७) सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - मृदुल सेन (खारी बिस्कीट), अर्जुन सोरटे (बाबा), धनंजय कुलकर्णी (वेलकम होम).

१७) सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक - नरेंद्र हळदणकर (बंदिशाळा), देवदास भंडारे (वन्समोअर), सतीश चिपकर (खारी बिस्कीट)

१८) सर्वोत्कृष्ट पदार्पण - प्रणाली भालेराव (टकाटक), गौरी इंगवले (पांघरूण), हेमल इंगळे (अशी ही आशिकी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com