Live: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? काय म्हणतो सर्व्हे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Survey
Live

महासर्वेक्षण: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? काय म्हणतो सर्व्हे?

महाविकास आघाडीची दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सकाळ माध्यम समुहातर्फे 'कोण आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री?' याबाबत महासर्वेक्षण करण्यात आलं आहे. २८८ मतदारसंघात आज निवडणूक झाल्यास काय चित्र असेल? महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक झाल्यास २८८ मतदारसंघात स्वतंत्र आणि विभागनिहाय कसे चित्र असेल? महाविकास आघाडीच्या प्रशासनाबद्दल जनमत काय आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा या महासर्वेक्षणातून घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील कार्यक्रम साम टीव्हीवर सुरु आहे. त्याच महासर्वेक्षणाचे लाईव्ह अपडेट्स 'सकाळ'वर...

 • हे सरकार लोकांना मान्य असल्याचा मुद्दा सर्व्हेतून स्पष्ट आहे. उद्धव ठाकरेंनी प्रभावी भूमिका वठवली आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत जेवढ्या जागा मिळाल्या नाहीत तेवढ्या उद्धव ठाकरे यांनी मिळवून दाखवल्या. भाजपचे आव्हान कायम आहे. अनिल देशमुख, परमबीर सिंग यांचे प्रकरण लोकांना आवडलेले नाही. त्याची दखल सरकारनं घेतली पाहिजे.

  - श्रीराम पवार, समूह संपादक, सकाळ

 • हा सर्व्हे जनमताचा कौल आहे...निवडणुकीचा निकाल नाही. मीडिया नेरेटिव्ह मध्ये अनेक पक्ष आघाडीवर आहेत. मविआबद्दल आज जरी लोकांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली असली तरी त्या शक्यतांवर चर्चा व्हावी. निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या पसंतीसंदर्भात जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या लोकप्रियतेसंदर्भातही आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे शितल पवार यांनी म्हटले आहे.

  - शितल पवार, कार्यकारी संपादक, सकाळ

तुमच्या मनातील मुख्यमंत्री

- ठाकरे कुटुंबातील थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरलेली पहिली व्यक्ती उद्धव ठाकरे. ते थेट मुख्यमंत्री झाले आणि जनतेच्या मनात त्यांनी विशेषतः कोरोना काळात चांगले स्थान मिळविले. २९.७ टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली आहे.

- देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचा कौल जातो. त्यांना २२.४ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. भाजपला मिळालेला एकूण कौल सकारात्मक असणे आणि विरोधी पक्षनेते म्हणून कामगिरीबद्दल असमाधान असतानाही फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल सर्वसाधारण सकारात्मकता आहे. भाजपच्याच पंकजा मुंडे यांचे नावही सर्व्हेक्षणात पुढे आले आहे.

- राष्ट्रवादीतून अजित पवार यांना सर्वाधिक पसंती आहे आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांना. राष्ट्रवादीत अजित पवार आणि सुप्रिया सुळे असे गट असल्याची चर्चा असते. ती चर्चा सर्व्हेक्षणात उमटली आहे

भाजप-राष्ट्रवादी:

- अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजप-राष्ट्रवादीने एकत्र येण्याच्या वावड्या अधुनमधून उठतातही. या पार्श्वभूमीवर तब्बल ७०.२ टक्के कौल अशा संभाव्य आघाडीच्या विरोधात आहे. - अवघ्या १०.२ टक्के लोकांना अशा आघाडीची अपेक्षा आहे.

- सर्व्हेक्षणात एकाच मुद्द्यावर इतके प्रचंड जनमत या एकाच उत्तरात आहे.

- भाजप-राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि नेत्यांना मतदारांनी त्यांची भविष्यातील दिशा स्पष्ट सांगितली आहे, असे म्हणता येईल.

शिवसेना-भाजप

- शिवसेना-भाजपने एकत्र येऊ नये, असा कौल ५५ टक्के आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील इतर दोन घटक पक्ष आणि सेना-भाजपमधील गटही सहभाही असू शकतो. त्यामुळे हे प्रमाण बहुसंख्य आहे.

- एकत्र आले पाहिजे, हे आजही २८.५ टक्के मतदारांना वाटते, ही भाजपसाठीची सरकारमध्ये दरी पाडण्याची संधी आणि शिवसेनेला महाविकास आघाडीतील आपला खुंटा बळकट करण्याची संधी म्हणून पाहाता येईल.

उद्धव ठाकरे

- मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात घेतलेल्या निर्णयांबद्दल समाधान होतेच; त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या एकूण कामाबद्दल सकारात्मकता तब्बल ६८.३ टक्के आहे.

- मुख्यमंत्र्यांची खुर्ची बळकट करणारा हा कल आहे. कारण, त्यांच्या कामाबद्दल निराशा असणाऱ्यांचा कौल १३.८ टक्के लोकांचाच आहे.

देवेंद्र फडणवीस

- ठाकरेंच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशारा सर्व्हेक्षणातून दिला आहे. त्यांच्या कामाबद्दल थेट असमाधान असणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २८.१ टक्के आहे आणि अपेक्षेपेक्षा कमी काम होत असल्याचे १७.७ टक्के मतदान सांगते आहे.

- जुलैमधील विधीमंडळ अधिवेशनात भाजपच्या आमदारांना निलंबित केले गेले. ते अधिवेशन भाजपने विधीमंडळाबाहेर घालवले. त्यानंतर भाजपला सूर गवसलेला नाही आणि फडणवीस यांनाही. हे या सर्व्हेक्षणाचा कौल अधोरेखीत करते.

भाजपच्या मतदारांमधील देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचे पर्स्पेशन:

 (भाजपच्या मतदारांमधील कल)

आज निवडणूका झाल्यास भाजपला मतदान करू, असे सांगणारेः ९,३०३ त्यापैकी,

·      देवेंद्र यांची कामगिरी निराशाजनक वाटणारेः ३२९

·      अपेक्षेहून कमी वाटणारेः ५८५

1.      निराशाजनक असतानाही देवेंद्र मुख्यमंत्री हवेतः ९६

2.      अपेक्षेहून कमी असतानाही देवेंद्र मुख्यमंत्री हवेतः २३७

3.      अपेक्षेहून कमी; निराशजनक असताना पंकजा मुंडे मुख्यमंत्री हव्यातः १६९

4.      अपेक्षेहून कमी; निराशजनक असताना इतर कोणी मुख्यमंत्री हवेः  २४१

·      त्यापैकी, देवेंद्र यांची कामगिरी उत्कृष्ट, समाधानकारक वाटणारेः ७१००

1.      उत्कृष्ट, समाधानकारक असल्याने देवेंद्र मुख्यमंत्री हवेतः ५८६५

2.      उत्कृष्ट, समाधानकारक असतानाही पंकजा मुंडे मुख्यमंत्री हव्यातः ५१३

3.      उत्कृष्ट, समाधानकारक असतानाही इतर मुख्यमंत्री हवेतः ३८७

MVA: काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येण्याबाबत काय वाटतं?

- भाजपला रोखण्यासाठी महाराष्ट्रात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग योग्य असल्याचे ५४.१ टक्के लोकांनी म्हटले आहे.

- मात्र, ३१.१ टक्के जनतेचा कौल या आघाडीच्या विरोधात आहे. ही आघाडी चूक असल्याचे त्यांना वाटते.

- महाराष्ट्रात तीन मोठ्या पक्षांनी एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे, या पार्श्वभूमीवर ३१.१ टक्के हा मतदारांचा मोठा वर्ग आघाडीच्या विरोधात राहिला आहे, हे लक्षणीय आहे.

 • सरकारी कामगिरी जोखताना

- कोरोनाकाळातील निर्णयांचा कल इथेही कायम राहिला आहे. लॉकडाउन, निर्बंध, लसीकरण, मदत योजना आदींबद्दल ४३.९ टक्के लोकांना सरकारचे काम महत्वाचे वाटते आहे.

- भ्रष्टाचार हा मुद्दा केंद्राच्या यंत्रणा, भाजपचे नेते उच्चरवात मांडत आहेत; प्रत्यक्षात १६.७ टक्के लोकांना त्याचे महत्व वाटते. बेरोजगारीसारखा ज्वलंत विषय १४.२ टक्के लोकांना महत्वाचा वाटतो. ज्या शेतीवरून देशात वर्षभर रण माजले, त्यातील प्रश्नांबद्दल अवघे १०.७ टक्के जनमानस गंभीर आहे.

- महाराष्ट्रातील नागरीकरणामुळे राज्यासमोर प्रश्नांचे प्राधान्यक्रम बदलत आहेत, याची झलक सर्व्हेक्षणातून दिसते आहे, असे मानता येईल.

 • 31 टक्के लोकांना राज्यातील तीन पक्षांतील आघाडी आवडलेली नाही. त्यामुळे महाआघाडी लोकांना रुचली नाही. ते 31 टक्के लोकं भाजपचे आहेत. 40 टक्के एकटी मतं भाजपला मिळत असतील तर ते जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा भाजप मोठा पक्ष ठरेल, असा विश्वास श्वेता महाले यांनी व्यक्त केला.

  - श्वेता महाले, भाजप

जेव्हा आपण विरोधी पक्षात येतो तेव्हा आपली प्रतिमा बदलत नाही. लोकं त्याच प्रतिमेतून पाहतात. आता आत्मपरिक्षणाची वेळ आहे. अनेकजण पक्षबांधणीचा मुद्दा मांडत आहेत. त्यामुळे मला लोकांना काय हवे आहे हे जास्त महत्वाचे वाटते.

- शितल पवार, कार्यकारी संपादक, सकाळ

 • मुळात या सगळ्या फेव्हरेबल गोष्टी ज्या म्हणतोय त्याला सर्वेमध्ये कसे स्थान होते, हे पाहावे लागेल. मविआचे प्रभावी काम आहे. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही. या सरकारच्या स्थापन होण्याला भाजप स्वत: जबाबदार असणार आहे. अंतर्गत कलहामुळे बऱ्याचशा जागा भाजप गमावेल.

  - सुशील कुलकर्णी

 • लखीमपूरची घटना ही नक्कीच दुर्देवी आहे. मला हे सांगायचे आहे की, मराठवाडा, प.महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याची काळजी सरकारला नाही. सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत आली असती. तालिबानी पद्धतीनं शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांचे काही एक पडलेले नाही.

  - श्वेता महाले

केंद्राच्या यंत्रणांचा प्रभाव:

- ईडी, सीबीआय, नार्कोटिक्स ब्युरो ही नावे महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व पद्धतीने गेली दोन वर्षे चर्चेत आहेत. त्याचा प्रभाव मतदारांवर होतो आहे.

- राज्य सरकारवर प्रभाव टाकण्यासाठी केंद्राच्या यंत्रणांचा वापर होत असल्याचे महाराष्ट्रातील निम्म्या जनतेला वाटत असल्याचे सर्व्हेक्षणात दिसते आहे.

- त्याचवेळी, केंद्र प्रभाव टाकत नसल्याचे वाटणाऱ्यांची संख्या २९.४ टक्के आणि या विषयात ठाम निष्कर्षापर्यंत न आलेल्यांची संख्या लक्षणीय म्हणजे २०.४ टक्के आहे.

- केंद्राच्या यंत्रणांबद्दल सरसकट नाराजी आहे, असे वाटण्याजोही ही परिस्थिती नाही.

मविका सरकारची प्रतिमा:

- वाझे, ईडी या प्रकरणांमध्ये सरकारची बाजू बहुसंख्य जनतेने अजून तरी लावून धरलेली आहे.

- सरकारची प्रतिमा उद्ध्वस्त झाल्याचे २२ टक्के जनतेला वाटते आहे; मात्र प्रतिमेवर फरक पडलेला नाही आणि प्रतिमा मलिन झालेली नाही असं वाटणाऱ्यांची एकत्रित संख्या सुमारे तब्बल ६६.१ टक्के आहे.

नैसर्गिक संकटं:

- शेतीवर आलेली संकटं पेलण्यात सरकारच्या प्रतिसादाबद्दल सरसकट समाधान नाही.

- सरकारला अधिक जबाबदारीनं शेतीवरील नैसर्गिक संकटांकडं पाहायला हवं, हा संदेश जनता देत आहे.

 • आमदारांच्या कामाबद्दल:

  - अतिशय समाधानी आणि समाधानी असे एकत्रित प्रमाण सुमारे ६१ टक्के होतं.

  - तब्बल ३१.१ टक्के लोक आमदारांच्या कामाबद्दल समाधानी नाहीत. हा मुद्दा महत्वाचा आहे. सुमारे एक तृतियांश लोकांना आमदारांच्या कामात सुधारणा हवी आहे.

 • कोरोना स्थिती:

  - राज्य सरकारच्या कामाबद्दल बहुसंख्य जनतेची सकारात्मक भावना आहे. जनता सरकारच्या पाठीशी राहिल्याचे चित्र आहे.

  - कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकार कमी पडल्याचं सुमारे २५.६ टक्के लोकांना वाटतं.

  - महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरअखेर ६६.३१ लाख कोरोना रूग्ण आढळले. त्या पार्श्वभूमीवर सरकारच्या उपाययोजनांबद्दल सरसकट नाराजी नाही.

 • कोरोना निर्बंध:

  - कोरोना काळातील सरकारच्या उपाययोजनांबद्दलची सकारात्मक भावना निर्बंधांबद्दलच्या मतप्रदर्शनातही कायम राहिली आहे.

  - निर्बंध योग्य काळासाठी होते, असं बहुसंख्य लोकांना वाटतं; निर्बंध उठविण्यात उशीर झाल्यानं नुकसान झाल्याचं सुमारे ९.५ टक्के लोकांना वाटतं.

 • कोरोना हाताळण्यात बहुसंख्य जनता सरकारच्या कामाबद्दल सकारात्मक -

सरकार स्थापनेपासूनचा पुढचा काळ कोरोना महामारीशी लढण्यात गेला. सरकार, सरकारमधले मंत्री, विरोधी पक्षांचे नेते यांच्या दृष्टीने हा काळ आव्हानात्मक होता. या काळात राज्य सरकारच्या कामाबद्दल बहुसंख्य जनतेची सकारात्मक भावना आहे. जनता सरकारच्या पाठीशी राहिल्याचे चित्र आहे.

कोरोनाचा सामना करण्यात राज्य सरकार कमी पडल्याचं सुमारे २५.६ टक्के लोकांना वाटतं.

- महाराष्ट्रात २३ नोव्हेंबर अखेर ६६.३१ लाख कोरोना रूग्ण आढळले. त्या पार्श्वभूमीवर सरकारच्या उपाययोजनांबद्दल सरसकट नाराजी नाही.

सरकारने ही कामगिरी उत्तम रितीने पार पाडली असं ३४.६ टक्के लोकांना वाटते. तर कामगिरी समाधानकारक असल्याचे ३६ टक्के लोकांचे मत आहे. केवळ ११ टक्के नागरिकांनी सरकारच्या कामाबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

 • कोरोना निर्बंध हटविण्याचे निर्णय

कोरोना काळातील सरकारच्या उपाययोजनांबद्दलची सकारात्मक भावना निर्बंधांबद्दलच्या मतप्रदर्शनातही कायम राहिली आहे. निर्बंध योग्य काळासाठी होते, असं बहुसंख्य लोकांना वाटतं; निर्बंध उठविण्यात उशीर झाल्यानं नुकसान झाल्याचं सुमारे ९.५ टक्के लोकांना वाटतं. ५६ टक्के लोकांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांबाबत समाधान व्यक्त केले आहे.

 • आमदारांची कामगिरी

आपल्या मतदारसंघाच्या आमदाराच्या कामगिरीबद्दल अतिशय समाधानी व समाधानी असलेल्यांचे प्रमाण ६१ टक्के आढळले. त्यापैकी सुमारे ४० टक्क्यांनी आपण आमदारांच्या कामगिरीबद्दल समाधानी असल्याचं मत नोंदवलं तर २० टक्के अतिशय समाधानी असल्याचे दिसले.

- तब्बल ३१.१ टक्के लोक आमदारांच्या कामाबद्दल समाधानी नाहीत. हा मुद्दा महत्वाचा आहे. तर एक तृतियांश लोकांना आमदारांच्या कामाबाबत सुधारणा हवी आहे.

सध्या राज्यात काय चालू आहे? अनिल देशमुख आणि परमबीर सिंग प्रकरणाचा परिणाम त्या त्या पक्षावर झाला आहे. विचारधारेचा मुद्दा संपला आहे. सेक्युलर मताचा टक्का १ इतका आहे. मोदींच्या बाबत सांगायचे झाल्यास, त्यांनी जसे आपल्याला सगळे त्रास देतात असे चित्र निर्माण केले होते. भाजपची स्पेस कुठे असेल तर... तिकिट न मिळालेले नाराज यांच्यावर त्यांची मोठी भिस्त असेल. सेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष सुरु असणाऱ्या ठिकाणी भाजपने बाजी मारलीये.

- विश्वंभर चौधरी

काँग्रेसपुढे दुसरा पर्याय काय? भाजप शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता कमीच आहे. भाजपला स्वत:च्या बळावर सत्ता आणावी लागेल. कॉग्रेसची मतं कमी झाली आहेत. त्यांचा मतदार विशिष्ट भागात आहे. जागा कमी नाहीत तर त्यांची मतं कमी होत आहे. भाजपनं नव्यानं परिक्षण करण्याची गरज आहे.

- श्रीराम पवार

काँग्रेस जेव्हा मविआमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी अतिशय विचारपूर्वक भूमिका घेतली. त्यांनी यावेळी इतर पक्षांना पुढाकार देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचा मुद्दाच वेगळा आहे. एका मुख्यमंत्री पदासाठी सगळे काही विस्कटते... सर्वेक्षणामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहे. व्यक्ती म्हणून काही गोष्टी त्यात मांडण्यात आल्या आहेत. मोदींच्या लोकप्रियतेवर फडणवीसांची लोकप्रियता उभी आहे.

- नीलम गोऱ्हे

 • मविआचे नेते एकमेकांविरोधात बोलतात. ते जरी एकत्र निवडणूक लढवणार असे सांगतात. मात्र तसे होणार नाही.

  - श्वेता महाले

 • 2024 मुख्यमंत्री ही पुढची चर्चा आहे. जो किमान समान कार्यक्रम हाती घेतला आहे त्याची अंमलबजावणी कशी सुरु आहे हे पाहावे लागेल. सगळ्यांना पक्ष वाढीचा अधिकार आहे. संजय राऊतांनी काय बोलावे यावर माझे नियंत्रण नाही. आम्ही लोकांना न पटणारी भूमिका घेऊन हे सरकार स्थापन केले. आमचे सरकार यशस्वी होत आहे याचा आम्हाला आनंद आहे.

  - सत्यजित तांबे

राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणतात,

राज्यातील चित्र हे आगामी दहा वर्षे तरी असेच राहिल. तिन्ही पक्षांची रेंज 50 ते 60 च्या पुढे जाणार नाही. महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली तर भाजप सत्तेच्या अधिक जवळ जाईल, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे तीन पक्ष एकत्र आले आहेत.

 • सत्यजित तांबे म्हणतात,

मला हा समाधानकारक सर्व्हे वाटतो. राज्यातील लोकांना दिलासा देणारं सरकार आहे असे त्यातून वाटते. यापुढील काळामध्ये आम्हाला आमची भूमिका सिध्द करता येणार आहे. ज्या निवडणूका होणार आहे त्यात काय घडामोडी घडतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 • राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी म्हणतात,

काँग्रेसला फॅक्टर म्हणून वाढताना दिसत आहे. सर्व्हेतील आकडेवारी पाहिली की, काही कमी आहे. कित्येक ठिकाणी प्रादेशिक पक्षांमधील संघर्ष आहे. लोकांच्या भावना यावेळी महत्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे.

 • महाविकास आघाडी विरूद्ध भाजप

- सत्तेवर राहायचे असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला काँग्रेसला सोबत घ्यावेच लागेल, असा महाराष्ट्राचा आजचा कौल आहे. सर्व्हेक्षणात ३९.८ टक्के लोकांना काँग्रेससह महाविकास आघाडी असेल, तरच आघाडीला मतदान करायचे आहे.

- महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढत झाल्यास भाजपलाच मतदान करू, असे सांगणाऱ्यांचे प्रमाण २७.५ टक्के आहे. म्हणजे भाजपच्या मतदानात फारशी घट होईल, असे चित्र नाही.

- काँग्रेसला वगळले, तर महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची चिन्हे नाहीत. कारण, राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला केवळ १९.८ टक्के कौल आहे.

- हा महाराष्ट्रातील मतदारांची मानसिकता सांगणारा कौल वाटतो. एकत्र राहा, तरच भाजपला विरोधात ठेवू, असा मतदारांचा महाविकास आघाडीला संदेश आहे.

 • MVA: काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढल्यास

- भाजपला रोखण्यासाठी महाराष्ट्रात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग योग्य असल्याचे ५४.१ टक्के लोकांनी म्हटले आहे.

- मात्र, ३१.१ टक्के जनतेचा कौल या आघाडीच्या विरोधात आहे. ही आघाडी चूक असल्याचे त्यांना वाटते.

- महाराष्ट्रात तीन मोठ्या पक्षांनी एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे, या पार्श्वभूमीवर ३१.१ टक्के हा मतदारांचा मोठा वर्ग आघाडीच्या विरोधात राहिला आहे, हे लक्षणीय आहे.

 • 2019 मध्ये भाजपचे 119 आमदार होते. आम्ही विरोधीपक्षामध्ये आहोत. हे दळभद्री सरकार आहे.

  - श्वेता महाले (भाजप प्रवक्ते)

 • 2013 पासून अनेक सर्वे झाले. 2014 जेव्हा स्थलांतराचा सकाळचा कौल झाला तेव्हा त्यातून अनेक गोष्टी घडल्या. तर आनंदी आनंद जरुर आहे. दोन वर्षे पूर्ण होताना ठाकरे सरकारला आणखी मोठी झेप घेण्याची गरज वाटते.

  - नीलम गोऱ्हे

 • आज निवडणूक झाल्यास

- आतापर्यंतच्या सर्व प्रश्नांना जो कौल महाराष्ट्रातील जनतेने दिला, तोच या प्रश्नावर कायम राहिला आहे.

- पक्ष म्हणून सारे स्वतंत्र लढल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे २७.९ टक्के जनाधार राहील; त्याखालोखाल शिवसेनेला २४ टक्के जनाधार राहील. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शेवटी काँग्रेस असा कौल आहे.

- विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपला २५.७५, शिवसेनेला १६.४१, राष्ट्रवादीला १६.७१ आणि काँग्रेसला १५.८७ टक्के मतदान झाले होते. जवळपास तोच क्रम आताही कायम आहे.

 • महाविकास आघाडी विरूद्ध भाजप?

भाजपचा मतदार भक्कमच; काँग्रेस वगळून तर महाविकास आघाडी अशक्य

सत्तेवर राहायचे असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला काँग्रेसला सोबत घ्यावेच लागेल, असा महाराष्ट्राचा आजचा कौल आहे. सर्व्हेक्षणात ३९.८ टक्के लोकांना काँग्रेससह महाविकास आघाडी असेल, तरच आघाडीला मतदान करायचे आहे.

महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढत झाल्यास भाजपलाच मतदान करू, असे सांगणाऱ्यांचे प्रमाण २७.५ टक्के आहे. म्हणजे भाजपच्या मतदानात फारशी घट होईल, असे चित्र नाही.

काँग्रेसला वगळले, तर महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची चिन्हे नाहीत. कारण, राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला केवळ १९.८ टक्के कौल आहे.

हा महाराष्ट्रातील मतदारांची मानसिकता सांगणारा कौल वाटतो. एकत्र राहा, तरच भाजपला विरोधात ठेवू, असा मतदारांचा महाविकास आघाडीला संदेश आहे.

 • जर आज निवडणुका झाल्यातर?

आतापर्यंतच्या सर्व प्रश्नांना जो कौल महाराष्ट्रातील जनतेने दिला, तोच या प्रश्नावर कायम राहिला आहे. पक्ष म्हणून सारे स्वतंत्र लढल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे २७.९ टक्के जनाधार राहील; त्याखालोखाल शिवसेनेला २४ टक्के जनाधार राहील. त्यानंतर राष्ट्रवादी (२१.४ टक्के) आणि शेवटी काँग्रेस (१४.२ टक्के ) असा कौल आहे.

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपला २५.७५, शिवसेनेला १६.४१, राष्ट्रवादीला १६.७१ आणि काँग्रेसला १५.८७ टक्के मतदान झाले होते. जवळपास तोच क्रम आताही कायम आहे.

राज्याच्या इतिहासातली वेगळी घटना आजच्या दिवशी घडली होती. पक्षांतर्गत वैचारिक मतभेद आहे. लोकांनी या सर्वेक्षणातून काय विचार केला आहे. हेही आपल्याला कळणार आहे. राज्यातल्या 288 मतदारसंघातून सर्व लोकांचा कल जाणून घेण्यात आला आहे. सातत्यानं लोकं काय म्हणतात हे आपण जाणून घेतलं आहे. या सरकारची दोन वर्षे पूर्ण झाली आहे.

- श्रीराम पवार, सकाळ समूह संपादक

 • महाविकास आघाडीची दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सकाळ माध्यम समुहातर्फे 'कोण आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री?' याबाबत महासर्वेक्षण करण्यात आलं आहे. २८८ मतदारसंघात आज निवडणूक झाल्यास काय चित्र असेल? महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक झाल्यास २८८ मतदारसंघात स्वतंत्र आणि विभागनिहाय कसे चित्र असेल? महाविकास आघाडीच्या प्रशासनाबद्दल जनमत काय आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा या महासर्वेक्षणातून घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील कार्यक्रम साम टीव्हीवर सुरु आहे. त्याच महासर्वेक्षणाचे लाईव्ह अपडेट्स 'सकाळ'वर...