सोलापूरसह बीड, लातूर, धाराशिवमध्ये बनावट दारू विक्री! चिंचोळी एमआयडीसीत बनावट दारूचा कारखाना; गोदामात 1 लाख रिकामे बॉक्स, 1 लाख बाटल्या, टॅंगो पंच, भिंगरी ब्रॅंडचे बनावट बूच, लेबल

मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसीत बनावट देशी दारूचा कारखाना आढळला आहे. तेथील दोन गोदामांत रिकामे बॉक्स, टॅंगो पंच, भिंगरी दारूच्या ब्रॅंडचे बूच, स्पिरीट (अल्कोहोल), लेबल सापडले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात दोन कोटी एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात दारू व दारूचे साहित्य वाहतुकीची सात वाहने आहेत.
SOLAPUR sakal

SOLAPUR sakal

sakal

Updated on

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसीत बनावट देशी दारूचा कारखाना आढळला आहे. तेथील दोन गोदामांत रिकामे बॉक्स, टॅंगो पंच, भिंगरी दारूच्या ब्रॅंडचे बूच, स्पिरीट (अल्कोहोल), लेबल सापडले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात दोन कोटी एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात दारू व दारूचे साहित्य वाहतुकीची सात वाहने आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात संतोष बाबूराव ढोकर (वय ४६, रा. सोलापूर- बार्शी रोड, ता. बार्शी), धनराज अविनाश भोसले (वय २८, रा. पोखरापूर, ता. मोहोळ), महावीर विक्रम कदम (वय २९, रा. मानेगाव, ता. बार्शी), किशोर धेडूलाल सेलोकर (वय ४१, रा. बजारवाडी, मध्य प्रदेश, सध्या रा. चिंचोळी एमआयडीसी, ता. मोहोळ) व प्रदीप अवधेश यादव (वय २८, रा. आजमगड, उत्तर प्रदेश, सध्या रा. चिंचोळी एमआयडीसी) यांचा समावेश आहे. या कारखान्यातील बनावट दारू सोलापूरसह बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पाठवली जात होती, अशीही माहिती समोर आली आहे. आता गुन्ह्यातील फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

एक डीवायएसपी, १० पीआय, २५ जवानांची कारवाई

ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर, सोलापूरच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सागर अदाटे, पोलिस निरीक्षक जे. एन. पाटील, ए. व्ही. घाटगे, दुय्यम निरीक्षक आर. के. निंबाळकर, डी. आर. पवार, ए. बी. सरवदे, एस. बी. सिद, एस. बी. शेळके, एस. डी. कांबळे, विकास थोरात, दिलीप सानप यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली. यात जवान अनिल पांढरे, चेतन वनगुंटी, प्रशांत इंगोले, गजानन ढब्बे, कपिल स्वामी, अण्णा कर्चे, स्वप्नील आरमाळ, मंगेश मारसिंग, महिला जवान शेरखाने, वाहनचालक सलगर, सानप, वाघमारे, नवले आदींचा सहभाग होता.

४१ हजार ३०० सीलबंद बाटल्या, १४००० लिटर स्पिरीट

गोदामात ४१३ बॉक्स देशी दारू, ४१ हजार ३०० सीलबंद बाटल्या आणि ९० मि.ली. क्षमतेच्या २००० बाटल्या ६९ बॅरलमध्ये १३,८०० लिटर स्पिरिट, १२०० लिटर तयार ब्लेंड, १ ऑटोमॅटिक आणि १ सेमी- ऑटोमॅटिक बॉटलिंग मशिन, पाच आरओ प्लांट, दोन स्मॉल इन्जेक्ट प्रिंटर, १ जनरेटर, ४ इलेक्ट्रिक मोटार आणि ३२६ बॉक्स बाटल्या सापडल्या. याशिवाय १५ हजार ५०३ बनावट लेबल्स, एक लाख ३५ हजार ३०० बनावट बूच, २९५० रिकामे बॉक्स आणि ६ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur chincholi midc
Solapur State Excise Department raids illegal liquor manufacturing facility
Dr. Pradeep Kurulkar
Ahilyanagar
Marathi News Esakal
www.esakal.com