esakal | राज्यातील तापमान वाढीमुळे विजेची विक्रमी मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity

विजेची मागणी पूर्ण
राज्यासाठी आवश्‍यक विजेची मागणी ही इंडियन एनर्जी एक्‍सचेंजमधून ५७५ मेगावॅट वीज खरेदी करून व ९५० मेगावॅट, कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती करून पूर्ण केली आहे. मेरीट ऑर्डर डिस्पॅचनुसार जास्त वीज दर असलेले मे. रतन इंडिया- १०८० मेगावॅट, महानिर्मिती- ६३० मेगावॅट, एनटीपीसी - ६४० मेगावॅट असे एकूण २३५० मेगावॅट क्षमतेचे संच हे बंद असतानाही ही मागणी पूर्ण केल्याचे महावितरणने सांगितले.

राज्यातील तापमान वाढीमुळे विजेची विक्रमी मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई/ पुणे - राज्यातील तापमानात वाढ आणि शेती पंपांकडून मागणीत वाढ झाल्यामुळे विजेच्या मागणीत बुधवारी (ता. 19) विक्रमी वाढ झाली. विजेची मागणी मागील ऑक्‍टोबरच्या तुलनेत १८ टक्‍क्‍यांनी आणि आत्तापर्यंत नोंद झालेल्या कमाल मागणीपेक्षा ८२५ मेगावॉटने जास्त होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील वर्षी राज्यात मुसळधार पाऊस झाला. यंदा फेब्रुवारी सुरू होताच राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली. दोन दिवसांपूर्वी तापमान ३८ अंश सेल्सिअसवर गेले होते. त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. महावितरणकडे काल २१ हजार ५७० मेगावॉट विजेच्या मागणीची नोंद झाली. मागील वर्षी २३ ऑक्‍टोबरला २० हजार ७४५ मेगावॉट एवढी कमाल वीजमागणी नोंदवण्यात आली होती. विजेची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत बुधवारी १८ टक्‍क्‍यांनी जास्त होती. महावितरणने महानिर्मिती कंपनीकडून सात हजार ८५३ मेगावॉट, एनटीपीसी व एनपीसीआयएल यांच्याकडून चार हजार १३४ तर अदानी पॉवर, रतन इंडिया, जेएसडब्ल्यू, एम्को आदी प्रकल्पांतून चार हजार ५६७ मेगावॉट वीज घेतली.

राज्यात फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा 

मार्च आणि एप्रिल या महिन्यांतील अपेक्षित विजेची मागणी लक्षात घेऊन महावितरणने कंपन्यांकडून वीज खरेदी करण्याबाबत नियोजन केले आहे. मागणी असेल त्यानुसार कंपन्यांकडून वीज खरेदी करून ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याची तयारी महावितरणने केली आहे.
- अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण

loading image