२८ जूनपासून सलूनमध्ये केशकर्तनाला परवानगी, दाढीसाठी मात्र आणखी काही दिवस थांबावं लागणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

राज्यासाठी सर्वात मोठी बातमी मुंबईतून येतेय. राज्यात येत्या २८ जूनपासून केशकर्तनाला परवानगी देण्यात आली आहे

मुंबई : राज्यासाठी सर्वात मोठी बातमी मुंबईतून येतेय. राज्यात येत्या २८ जूनपासून केशकर्तनाला परवानगी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालाय. याबाबत माध्यमांना माहिती देण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून राज्यातील सलून्स बंद आहेत. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्यात महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेनला सुरवात झालीये. दरम्यान राज्यात सलून सुरु करावेत यासाठी नाभिक समाजाने अनेकदा आंदोलनं देखील केलीत. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा आणि सलून व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. 

हेही वाचा : मुंबई अनलॉक होतेय तरीही; लालबाग मार्केट पाच दिवस बंद! वाचा कारण

राज्यात सलून बंद असल्याने नाभिक समाजाला मोठा तोटा सहन करावा लागत होता. ग्राहकांनाही मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ केशकर्तनाला परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच सलूनमध्ये ग्राहकांना दाढी किंवा फेशियल यासारख्या गोष्टी करता येणार नाहीत. सोबतच केस कपणाऱ्याने आणि ग्राहकांनी तोंडाला  मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलंय.  

हेही वाचा : काय सांगता; 'रेमेडेसीवीर' औषध मिळणार मोफत! पण कुठे, वाचा बातमी सविस्तर

WHO च्या काही मापदंडानुसार  सलूनमुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होऊ शकतो असं बोललं जात होत. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात राज्य सरकारला केंद्राकडून राज्यातील लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याची मुभा देण्यात आलीये. राज्यातील अनेक उद्योगधंदे सुरु झालेत. केवळ नाभिक समाजाला आपली दुकानं सुरु करायची परवानगी का नाकारली जातेय असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. अशातच राज्यात तब्बल ५ सलून व्यावसायिकांनी आत्महत्या देखील केली होती.

दरम्यान आता मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानंतर नाभिक समाजाला मोठा दिलासा मिळालाय. 

salons will reopen from 28th june permission only for hair cutting is granted by state government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salons will reopen from 28th june permission only for hair cutting is granted by state government