संभाजी भिडेंना ८ दिवसांत पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश; ‘ऑडिओ’ची फॉरेन्सिक तपासणी होणार

 Sambhaji Bhide
Sambhaji Bhide
Updated on

अमरावती - अमरावती येथे २७ जुलै रोजी येथील महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. शिवाय वादग्रस्त विधानांबाबत राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे व आयोजकांना नोटीस जारी केली आहे.

 Sambhaji Bhide
Uddhav Thackeray : भिडेंच्या वादग्रस्त विधानावरून ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले, गुरुजी...

संभाजी भिडे यांना ८ दिवसात अमरावती पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आता ८ दिवसात संभाजी भिडे अमरावती पोलिसांकडे हजर राहतात का? हे पाहावं लागणार आहे. याच संदर्भात राज्यात ज्या ठिकाणी भिडेंवर गुन्हे दाखल झाला, त्या ठिकाणचे गुन्हे अमरावतीत वर्ग करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.

 Sambhaji Bhide
संभाजी भिडेंच्या फोटोला दुग्धभिषेक करून घोषणाबाजी; समर्थकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

संभाजी भिडे यांनी २७ जुलै रोजी सायंकाळी ६ ते १० या कालावधीत एका मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. त्या दरम्यान, त्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून व लोकांमध्ये असंतोष पसरवून विविध समाजघटकांमध्ये वाद वाढविण्याचे भाष्य केले. तथा महापुरुषांची बदनामी केली.

या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे (रा. सांगली), निशांतसिंह जोध, अविनाश मरकल्ले व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांना नोटीस जारी करण्यात आल्याचं पोलिस प्रशासनाने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Suhas Shirsath Makes First Demand As MLC Seeks Land For Sambhaji Maharaj Equestrian Statue In Phulambri
MPSC Success Story: अंधार छेदत शिक्षणाधिकारीपदी झेप! अंधत्वावर मात करत पत्नीच्या ऑडिओ रेकॉर्डिंगवर अभ्यास, राज्यात प्रथम; सुजित शिंदेंची प्रेरणादायी कहाणी..
Why did Sambhaji Bhide support Sainik Takli MIDC?
Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Sangameshwar
Marathi News Esakal
www.esakal.com